केवळ विद्वान आहे म्हणून कलावंत, साहित्यिकाला विधान परिषदेवर पाठवू नका: रामदास फुटाणे

राज्यपालनियुक्त 12 जागा पाठवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे मात्रअलीकडे ते काम प्रचारमाध्यमे करू लागली आहेत. -रामदास फुटाणे
ex mlc ramdas futane on governor nominated mlc post
ex mlc ramdas futane on governor nominated mlc post

 पुणे : "कलावंत किंवा साहित्यिक केवळ विद्वान आहे म्हणून त्याला विधानपरिषदेत पाठवणे चुकीचे आहे. कलावंत-लेखक समाजाच्या उपयोगाचा असावा. तो माणूस म्हणून मोठा असावा," असे मत माजी आमदार आणि प्रसिद्ध वात्रट टिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.

विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 जागांबाबत सध्या राज्यात चर्चा आहे. अनेक इच्छुक आपआपल्या परीने फिल्डिंग लावत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांतील इच्छुकांनी आमदारकी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. या घडामोडीवर साहित्यिक रामदास फुटाणे यांनी भाष्य केले आहे.

"कलावंत म्हणून किती मोठा यापेक्षा माणूस म्हणून किती मोठा हे महत्त्वाचे आहे. राज्यपालनियुक्त 12 जागा पाठवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे मात्र अलीकडे ते काम प्रचारमाध्यमे करू लागली आहेत,"असे रामदास फुटाणे म्हणाले.

"लेखकाला किंवा कलावंताला विधानपरिषदेत संधी दिली पाहिजे हे खरे आहे. पण जो माणूस घरातल्या लोकांशीही नीट वागत नाही. ज्याला शेजारीपाजारीही ओळखत नाहीत असा मोठा माणूस काय कामाचा? सभागृहात जाऊन तो ज्या घटकांचा प्रतिनिधी आहे किमान ते प्रश्न त्याने मांडले पाहिजेत. कोणीतरी खूपच मोठा आहे आणि खूपच प्रतिभावंत आहे. एवढ्या एकाच निकषावर आमदारकी बहाल करणे किती बरोबर आहे?" असा सवाल रामदास फुटाणे यांनी विचारला.

"खूपच मोठा साहित्यिक आहे पण स्वतःच्या भावालाही मदत करत नाही. तो सामाजिक कामात कोठेही सहभागी नसतो. अशा माणसाला ते पद देणे चुकीचे आहे. लेखक हा लेखक म्हणून मोठा हवा पण माणूस म्हणूनही मोठा हवा. आपल्याकडे एकारलेले प्रतिभावंत आहेत. सामाजिक जाणीव असलेल्या प्रतिभावंतांला विधानपरिषदेवर संधी मिळावी,"असे फुटाणे म्हणाले. "विधानपरिषदेवर जाणारा प्रतिनिधी कोणत्या जातीचा वा धर्माचा प्रतिनिधी म्हणून जायला नको," असे मतही रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. 
 
सोलापूरमधील भाजपच्या दोन माजी मंत्र्यांमध्ये विसंवाद 

सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दोन लाखांची कर्जमाफी दिली. राज्यातील 15 लाख शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित आहेत. लॉकडाऊमुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसून त्यांना आता बॅंकांकडून कर्जही मिळत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपने आजपासून (ता. 22) राज्यभर आंदोलनास सुरुवात केली आहे. मात्र, सोलापुरातील दोन माजी मंत्री सुभाष देशमुख व विजयकुमार
देशमुख यांच्यात आंदोलनाबाबत विसंवाद दिसून आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com