महाआघाडी एकत्र लढली तरी भाजप स्वबळावर लढेल, चंद्रकांतदादांचा निर्धार 

"सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी कोरोना आणि मराठा आणक्षणाचा विषय हाताळण्यात आघाडी सरकारला मोठे अपयश आल्याचा आरोप केला.
महाआघाडी एकत्र लढली तरी भाजप स्वबळावर लढेल, चंद्रकांतदादांचा निर्धार 

पुणे : राज्यात आगामी निवडणुकांत महाआघाडी सरकार एकत्रित लढले तरी काही फरक पडणार नाही. उलट आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची भारतीय जनता पार्टीची तयारी आणि इच्छादेखील आहे, अशी भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात मांडली. 

पाटील यांची ही मुलाखत "सरकारनामा'च्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर सायंकाळी पाच वाजता पाहावयास मिळेल. निवडणुकीत महाआघाडी एकत्र लढली तर त्यांच्यात किती बंडखोरी होईल याचा विचार करा. मात्र, आघाडी म्हणून ते कसेही लढले तरी आम्ही मात्र, सवतंत्रपणे लढणार आहोत. स्वतंत्रपणे लढण्याची आमची तयारी आणि इच्छादेखील आहे, पाटील यांनी सांगितले. निवडून आल्यानंतर पुन्हा आम्हाला फसवणूक नको आहे. त्यामुळे स्वतंत्र लढणे अधिक हिताचे आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. 

पाटील म्हणाले, "" या सरकारमध्ये समन्वय नाही. त्याचा परिणाम सर्वोच्च न्यायालयातील निकालावर झाला. परिणामी त्याचा फटका राज्यातील लाखो मराठा तरूणांना सहन करावा लागत आहे. शिक्षण आणि नोकरीच्या अनेक संधी मराठा तरूणांच्या हातातून जात आहेत. किमान आरक्षणाच्या विषयात तरी आघाडीतील तीन्ही पक्षांनी समन्वय ठेवला असता तर मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात अबाधित राहिले असते. सरकारमधील मंत्र्यांचा परस्परांशी समन्वय नाही. त्यामुळे न्यायालयात भूमिका मांडताना गोंधळा झाला. त्यातून आरक्षण स्थगितीपर्यंतचा निर्णय झाला. भाजपा सरकारच्या काळात आरक्षणाचा विषय पक्ष आणि सरकारच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय होता. 

उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू सक्षमपणे मांडण्यात आम्ही कोणतीही कसूर केली नाही. त्याचा फायदा झाला उच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले.यामागे कायद्याचा अभ्यास करून प्रयत्पूर्वक केलेले काम होते. मात्र. आम्ही कष्टाने मिळविलेले आरक्षण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले. आरक्षणासाठी मराठा समाजाचे आता सुरू असलेले आंदोलन स्वयंस्फूर्त आहे. त्याला आमची फूस असल्याचा सरकारचा आरोप चुकीचा असून सरकार सर्वोच्च न्यायालयात आलेले अपयश आमच्यावर आरोप करून झाकू शकत नाही.'' असेही यावेळी पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com