नामांकित व्यावसायिक गौतम पाषाणकर शेवटचे कोल्हापुरात दिसले  - Entrepreneur Gautam Pashankar was last seen in Kolhapur | Politics Marathi News - Sarkarnama

नामांकित व्यावसायिक गौतम पाषाणकर शेवटचे कोल्हापुरात दिसले 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

गौतम पाषाणकर यांना बेपत्ता होऊन तिसरा आठवडा सुरू झाला आहे.

पुणे : पुणे शहरातील नामांकित व्यावसायिक गौतम पाषाणकर हे तीन आठवड्यापासून बेपत्ता आहेत. परंतु अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. मात्र, पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे. ते कोल्हापूरपर्यंत दिसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र त्यापुढे ही आमचा तपास सुरू आहे, असे पुण्याचे पोलिस आयुक्त अभिनव गुप्ता यांनी सांगितले. 

पोलिसांच्या पथकांना काही महत्त्वाचे धागेदोरे प्राप्त झाले आहेत, अशी माहितीही आयुक्त गुप्ता यांनी या वेळी दिली.

याविषयी गुप्ता म्हणाले, "व्यावसायिक पाषाणकर हे बेपत्ता झाल्यापासून पहिल्या सात दिवसांमध्ये पोलिसांनी त्यांचा मोठ्या प्रमाणात शोध घेतला. त्यानंतरही पोलिसांची पथके पुणे शहराबाहेर, तसेच अन्य जिल्ह्यांत जाऊन शोध घेत आहेत. ते कोल्हापूरपर्यंत दिसले असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निदर्शनास आले आहे. त्यापुढेही पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.'' 

गौतम पाषाणकर यांना बेपत्ता होऊन तिसरा आठवडा सुरू झाला आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही, त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीनुसार, शिवाजीनगर पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके पाषाणकर यांचा शोध घेत आहेत. पोलिसांची पथके शहराबाहेर अन्य जिल्ह्यातही त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, या प्रकरणावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता स्वतः गांभीर्याने लक्ष्य ठेवून आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख