या कारणांमुळे शरद पवारांनी पृथ्वीराज जाचकांना जवळ केले...

जाचक हे उत्कृष्ठ प्रशासक म्हणून ओळखले जातात. त्यांची कामगार व कर्मचारी वर्गामध्ये धास्ती आहे. गाळप हंगाम सुरु असताना रात्री-अपरात्री कारखान्यावरती कारखान्यावरती येत असल्यामुळे त्यांचा कर्मचाऱ्यामध्ये दबदबा आहे. जाचक यांच्याकडे कारखान्याचे सुत्रे गेल्यास कारखाना जोमाने सुरळीत सुरु राहू शकतो.तसेच जाचक यांच्या तातडीने निणर्य घेण्याची क्षमता असल्याने संभाव्य अडचणींवरमात होवू शकते.
sharad-pawar-prithviraj-jachak
sharad-pawar-prithviraj-jachak

वालचंदनगर : साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामध्ये दाखल होणार असल्याने जाचक यांच्या अनुभवाचा  भवानीनगर (ता.इंदापूर) येथील  श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा व सभासदांचा फायदाच होणार आहे.

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर सहकारी साखर कारखान्याचेे कार्यक्षेत्र बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये आहे. दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे. कारखान्यावर पकड असणाऱ्या पक्षाचे दोन्ही तालुक्यावरती वर्चस्व राहते. इंदापूर व बारामती तालुक्यातील महत्वाची गावे कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत. गेल्या काही वर्षांपासून छत्रपती सहकारी साखर कारखाना आर्थीक अडचणींमध्ये सापडला आहे. गतवर्षीच्या गळीत हंगामामध्ये कारखान्याला अनेक अडचणीचा सामाना करावा लागला. तसेच कारखान्याने गाळप केलेल्या उसाची  एफआरपी संपूर्ण रक्कम अद्यापपर्यंत दिली नाही. कारखान्याच्या कामगारांचे पगारही  थकीत आहेत. जाचक यांच्या अनुभवाचा कारखान्याला फायदा होणार आहे.

पृथ्वीराज जाचक उत्कृष्ट प्रशासक...
जाचक हे उत्कृष्ठ प्रशासक म्हणून ओळखले जातात. त्यांची कामगार व कर्मचारी वर्गामध्ये धास्ती आहे. गाळप हंगाम सुरु असताना रात्री-अपरात्री कारखान्यावरती कारखान्यावरती येत असल्यामुळे  त्यांचा कर्मचाऱ्यामध्ये दबदबा आहे. जाचक यांच्याकडे कारखान्याचे सुत्रे गेल्यास कारखाना जोमाने सुरळीत सुरु राहू शकतो.तसेच जाचक यांच्या  तातडीने निणर्य घेण्याची क्षमता असल्याने  संभाव्य अडचणींवर मात होवू शकते.

साखर विक्रीचे नियोजन...
सध्या छत्रपती सहकारी साखर  कारखान्याची २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० ची साखर विक्री खोळंबली आहे. यामुळे व्याजाचा बोझा वाढत चालला आहे. या साखरची तातडीने विक्री झाल्यास कारखाना अडचणीमधून बाहेर पडण्यास मोलाची मदत होणार आहे. जाचक यांनी महाराष्ट्र राज्य साखर संघावरती ही काम केले असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा कारखान्याला होईल, अशी सभासदांची अपेक्षा आहे.

रिकव्हरी वाढविण्यास प्रयत्न होणे गरजेचे...
नीरा खोऱ्यातील इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये गतवर्षीच्या गाळप हंगामामध्ये छत्रपती कारखान्याची रिकव्हरी कमी आहे. यामुळे एफआरपीची रक्कम कमी झाल्याने शेतकऱ्यांनी प्रतिटन  सुमारे ३०० ते ४०० रुपयापांचा दर कमी मिळाला.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.रिकव्हरी वाढविण्यासाठी उस लागवड व तोडणी व्यस्थापन महत्वाचे आहे. उसाची वेळेपूर्वीच व वेळेनंतरची तोडणी थांबल्यास  तसेच शेतकी विभाग व केमिस्टी विभागाने नियोजबद्ध काम केल्यास रिकव्हरी वाढणार असून शेतकऱ्यांचा फायदा आहे. जाचक यांच्या कार्यपद्धतीमुळे हे सहज शक्य होणार आहे.

गाळपाचे आवाहन...
छत्रपती सहकारी साखर कारखाना अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी दोन गळीत हंगाम जोरदार होणे गरजेचे आहे. चालू वर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये २० हजार एकर उसाची उपलब्धा असून ९ लाख मेट्रीक टनाचे गाळप झाल्यास व गेटकेनचा ३ लाख टन उस मिळाल्यास साखर कारखाना अडचणीमधून बाहेर पडू शकण्यास मदत होणार आहे. 

पंचवार्षिक निवडणूकीची वाटचाल बिनविराेधकडे...
कोरोना महामारीची प्रभाव कमी झाल्यानंतर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे.  कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक राष्ट्रवादीकडे आल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध होवू शकते अशी अपेक्षा आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यास एकतर्फी होवून पवार-जाचक गटाची एकहाती सत्ता सहज येवू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com