मास्क न वापरणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत तिकिट देऊ नका

उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या दीड वर्षापासून मास्क वापरतात.
Don't give tickets to activists who don't wear masks : Supriya Sule
Don't give tickets to activists who don't wear masks : Supriya Sule

वालचंदनगर (जि. पुणे) : कोविड अजूनही संपलेला नसून प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या दीड वर्षापासून नियमितपणे मास्क वापरत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी मास्क वापरणार नाहीत. मास्क न वापरलेला कार्यकर्ते अथवा पदाधिकाऱ्यांचा फोटो तीन वेळा आढळून आल्यास त्यांना निवडणुकीचे तिकिट देऊ नका, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना केली. (Don't give tickets to activists who don't wear masks : Supriya Sule)

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या सूचनेने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना मास्क वापरणे अनिवार्य ठरणार आहे. अन्यथा तिकिटासाठी स्पर्धक कार्यकर्त्यांकडून एकमेकांचे फोटो वरिष्ठापर्यंत पोचविण्याची स्पर्धा रंगण्याची चिन्हे आहेत.

इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी येथे सुप्रिया सुळे बोलत होते. त्या म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या दीड वर्षापासून मास्क वापरतात. दीड वर्षात अजितदादांचा विनामास्कचा चेहरा नागरिकांना पहावयास मिळालेला नाही. कोरोना नियमांचे दादा काटेकोरपणे पालन करीत आहेत. कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकांनी मास्क वापरणे गरजेचे आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे मास्कचा वापर करणार करीत नाहीत, असे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा तीन वेळा फोटो आल्यानंतर तो कितीही मोठा असला तरीही त्यांना तिकिट न देण्याचा सल्ला सुळे यांनी गारटकर यांना दिला आहे. 

पुणे जिल्ह्यामध्ये १८ ऑक्सिजन प्रकल्प मंजूर झाले असून तेही लवकरच सुरु होतील. खरीपाचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांना बि-बियाणे उपलब्ध होत आहेत. दिवाळीपर्यंत केंद्र सरकारकडून नागरिकांना अन्न धान्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, असे सुळे यांनी सांगितले.

महागाईच्या मुद्यावर केंद्राने अधिवेशन बोलवावे 

पेट्रोल, डिझेलचे वाढते दर व महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. केंद्र सरकारने कोविडच्या काळामध्ये खासदार फंडालाही कात्री लावली आहे. याचा परीणाम विकासावर झाला आहे. पेट्रोल, डिझेलचे वाढते दर व महागाईच्या मुद्यावर केंद्र सरकारने अधिवेशन बोलवून चर्चा घडवून आणावी, अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली

 
भरणेमामांच्या कामाचे कौतुक

सुप्रिया सुळे यांनी या वेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे कौतुक केले. कोरोनाच्या काळातही इंदापूर तालुक्याचा विकास थांबलेला नाही. राज्यमंत्री भरणेमामांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठा विकास साधला. गेल्या पंचवार्षिकमध्ये विरोधी पक्षाचे आमदार असतानाही इंदापूर तालुक्यासाठी त्यांनी सर्वाधिक विकासनिधी खेचून आणला. आत्ता तर ते राज्यमंत्री असून इंदापूर तालुक्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होत आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com