'भविष्यात महाआघाडी राहील, या भ्रमात राहू नका' : शिवसेना जिल्हाप्रमुखाने खोडला वरिष्ठांचा दावा 

एकमेकांची उणीदुणी काढून पक्षाला कमजोर करण्यापेक्षा पक्षाची ताकद कशी वाढेल ते पहावे.
Don't be under the illusion that there will be a  mahavikas Aghadi in future : Mauli katke
Don't be under the illusion that there will be a mahavikas Aghadi in future : Mauli katke

शिरूर : "शिरूरच्या खासदारांनी भ्रमनिरास केला आहे. त्यांची समाजाशी नाळ नाही, प्रश्‍नांची जाण नाही. अशावेळी शिवसैनिकांनी आपले नेते, आपले काम समाजापर्यंत पोचवावे. भविष्यात महाविकास आघाडी राहील, या भ्रमात न राहता शिवसैनिकांनी स्वबळाची तयारी ठेवावी, जनमत वाढवून संघटन मजबूत करावे. एकमेकांची उणीदुणी काढून पक्षाला कमजोर करण्यापेक्षा पक्षाची ताकद कशी वाढेल ते पहावे,'' असे सांगत शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी आपल्याच वरिष्ठांकडून महाविकास आघाडी पाच नव्हे तर 25 वर्षे टिकेल, असा जो दावा करण्यात येत आहे, तोच खोडून काढला आहे. 

शिरूर तालुक्‍यातील पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीत कटके बोलत होते. या वेळी शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, जिल्हा सल्लागार अनिल काशीद, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक श्रद्धा कदम, पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, पोपटराव निंबाळकर आदी उपस्थित होते. 

शिरूर लोकसभा मतदारसंघात आपले आमदार-खासदार नसल्याने विकासकामांना पैसे मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री आपले आहेत. थेट त्यांच्याकडून या भागाच्या विकासासाठी भरीव निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे, असे सांगून आढळराव यांनी शिवसैनिकांमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर नवचैतन्य फुंकले. अपापसातील गटबाजी टाळा आणि विकासकामांसाठी झटा, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले. 

आढळराव पाटील म्हणाले, "राज्यात सरकार आपले आहे, मुख्यमंत्री आपले आहेत. अशावेळी शिवसैनिकांनी तळागाळात जावे, सामान्य लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात. विकासकामे सुचवावीत. त्यासाठी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. कोरोनाची स्थिती केवळ मुख्यमंत्र्यांचे नियोजन आणि दूरदृष्टीमुळे सुधारली. अतिवृष्टीग्रस्तांना दहा हजार कोटींची मदत त्यांनी केली, कर्जमाफी केली. याचीही माहिती जनतेला द्यावी.'' 

शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख विजया टेमगिरे, तालुकाप्रमुख योजना ढमढेरे, अलका ढाकणे, अनिल लोंढे, संजय पवार, मानसिंग कदम, मनोज शिंदे, आनंद ढोरजकर, स्वाती बोरकर, गणेश फडतरे आदींनी संघटना व विकास कामांविषयी विविध सूचना मांडल्या. 

शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जिल्हा संघटक संजय देशमुख यांनी प्रास्ताविक, आंबेगाव विभाग प्रमुख गणेश जामदार यांनी सूत्रसंचालन केले. शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर थोरात यांनी आभार मानले. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com