रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वितरण शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फतच करा

त्यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शन सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात उपलब्ध होतील.
Distribute Remedisvir injections only through government health system : Ashok Pawar
Distribute Remedisvir injections only through government health system : Ashok Pawar

लोणी काळभोर (जि. पुणे) : कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक असणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वितरण शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत करण्याची गरज आहे. या संदर्भात आजच उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली. 

हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत आजपासून कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कोविड सेंटरचे उदघाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, अतिरिक्त तहसीलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य आधिकारी डाॅ. सचिन खरात, जिल्हा परिषद सदस्या अर्चना कामठे, हवेली पंचायत समितीचे सदस्य अनिल टिळेकर, युगंधर काळभोर, लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी डाॅ. दगडू जाधव आदी उपस्थित होते. 

चतुःसूत्री पाळा

आमदार पवार म्हणाले, पूर्व हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील गावांत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपण सर्वांनी काळजी न घेतल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच, मृत्यूदरही वाढला आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणे या चतुःसूत्रीचा वापर केला पाहिजे. 

पूर्व हवेलीत दोन कोविड​ सेंटर

हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील गावांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीत शासकीय कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीतील दोन सेंटरमध्ये एकुण २०० रुग्णांची सध्या व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी पाच तज्ञ डाॅक्टर व इतर कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व वैद्यकीय उपचार मिळणार

दरम्यान, येथे दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाची पहिल्यांदा हिमोग्राम, डी डायमर, सिरम फेरिटिन, सीआरपी व एलडीएच या पाच प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येतील. या चाचण्यांमधून रुग्ण कोरोनाच्या कुठल्या स्टेजमध्ये आहे, हे समजेल. त्यानुसार रूग्णाला खासगी रुग्णालयात मिळतात, ते सर्व वैद्यकीय उपचार या ठिकाणी देण्यात येणार आहेत. या चाचण्या करण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने एका खासगी संस्थेशी करार केला आहे. या खासगी संस्थेचे कर्मचारी दररोज येऊन रुग्णांच्या चाचण्या घेऊन तातडीने रिपोर्ट ऑनलाईन देतील. सध्या सुरू असलेल्या कोरोनाचे विषाणू पहिल्याच दिवशी रूग्णाच्या फुफुसापर्यंत जात असल्याने दाखल झालेल्या रुग्णाला तातडीने दर्जेदार उपचार देण्याची गरज असते. त्यामुळे येथे सर्व प्रकारचे दर्जेदार उपचार येथे दिले जाणार आहेत.  

रेमडेसिव्हिरसाठी उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी आजच चर्चा करणार आहे. या चर्चेत रेमडेसिव्हिर इंजेक्शन शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत वितरित करावे, अशी त्यांच्याकडे करणार आहे. त्यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शन सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात उपलब्ध होतील, या दृष्टीने प्रयत्न करणार आहे, असे  आमदार अशोक पवार यांनी सांगितले.  

पूर्व हवेलीत २०० रुग्णांची सोय व्हावी, अशी व्यवस्था सध्यातरी उपलब्ध केली आहे. आणखी गरज लागल्यास आणखी १०० ते १५० बेडची तयारी करण्यात येईल. मात्र, नागरिकांनी घाबरून जाऊ नये व प्रशासनास सहकार्य करावे. 
- अशोक पवार, आमदार 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com