दिलीप बाठे यांचे कोरोनामुळे निधन 

दिलीप नामदेव बाठे यांचे कोरोनामुळे निधन झाले.
Sarkarnama Banner (47).jpg
Sarkarnama Banner (47).jpg

भोर : तालुक्याच्या राजकारणातील मुलूख मैदानी तोफ आणि राजकारणातील गेमचेंजर म्हणून ओळख असलेले दिलीप नामदेव बाठे (वय ६१) यांचे कोरोनामुळे निधन झाले. गेले १४ दिवस ते व्हेंटीलेटरवर होते. त्यांच्यामागे पत्नी, एक विवाहीत मुलगी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. भोर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य रोहन बाठे यांचे ते वडील होत. 

ता. २८ मार्चला त्यांची  कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. दिलीप बाठे हे जिल्हा कॉग्रेसचे उपाध्यक्ष, शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे मुख्य समन्वयक, गुंजवणी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे निमंत्रक आणि कापूरव्होळ (ता. भोर) येथील अमृता उद्योग समूहाचे संस्थापक म्हणून कार्यरत होते. याशिवाय जिल्हा भूविकास बँकेचे ते माजी संचालकही होते. राजकारणातील त्यांच्या भूमिकेवरुन तालुक्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळत असे.

सर्वसामान्य कुटुंबातील दिलीप बाठे यांनी कामगार चळवळीतून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. १९९२ साली ते सक्रीय राजकारणात आले. तालुक्याच्या राजकारणाचा त्यांचा अभ्यास अतिशय अचूक होता. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता होती. तालुक्याच्या धार्मिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. रायरेश्वर दिडींतून ते दरवर्षी पायी पंढरीच्या वारीला जात असत. याशिवाय अनेक भाविकांना ते दरवर्षी काशीसारख्या तिर्थक्षेत्रांचे दर्शन घडवीत होते. तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी, अधिका-यांनी आणि मान्यवरांनी दुखः व्यक्त केले.


 
तालुक्यातील अनेक उत्कृष्ट संघटक, सर्वोत्तम वक्ते राजकारणामधील एक अनुभवी नेतृत्व तालुक्याने हरविले आहे. दिलीप बाठे हे राजकीय गेमचेंजर होते. राजकारणा कोणत्या क्षणी योग्य भूमिका घेणारे प्रगल्भ राजकारणी होते. त्यांच्या जाण्याने कॉग्रेस पक्षाची मोठी हाणी झालेली आहे. त्यांच्या मृतात्म्यास परमेश्वर शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुखःत तालुक्यातील सर्व कॉग्रेसजण सहभागी आहोत.
  - आमदार संग्राम थोपटे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com