एखाद्या पक्षाच्या बैठकीत असा ठराव कसा होऊ शकतो : अजित पवारांचा संतप्त सवाल  

राज्यातील सर्व साखर कारखान्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिनार असल्याचे भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
  Ajit Pawar .jpg
Ajit Pawar .jpg

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची सीबीआय चौकशी करावी, असा ठरावा भाजपच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता. त्यावर अजित पवार यांनी शुक्रवारी भाष्य केले. पवार म्हणाले, एखाद्या पक्षाच्या बैठकीत अशा प्रकारचा ठराव होण्याची ही देशातील पहिलीच घटना असेल. अशा प्रकारचा ठराव पक्षाच्या बैठकीमध्ये होणे हे योग्य नाही. चौकशी ही पारदर्शक झाली पाहिजे, असे पवार म्हणाले.  (Deputy Chief Minister Ajit Pawar criticizes BJP)

साखर कारखान्याची विक्री ही उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली आहे. जर चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप झाले तर बँक अडचणीमध्ये येते. राज्य सरकारी बँक नफ्यात आहे. माझ्यावरचे आरोप राजकीय दृष्टकोणातून केले गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या साखर कारखान्याची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली होती. त्या विषयी बोलताना अजित पवार म्हणाले, की घोटाळा काय झाला हे भाजपने दाखवावे. 

राज्यातील सर्व साखर कारखान्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिनार असल्याचे भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर पत्र लिहिले म्हणजे आरोप सिद्ध झाले असे होत नाही. पत्र लिहिणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, देशामध्ये लोकशाही आहे. प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे, असा टोला त्यांनी पाटील यांना लगावला. मराठा आरक्षणा संदर्भात बोलताना पवार म्हणाले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे. की केंद्र सरकराने संसदेत निर्णय घेऊन घटना दुरुस्ती करावी.

पुण्यातील आंबील ओढा परिसरातील अतिक्रमनावर प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. हे अतिक्रम अजित पवार यांच्या सांगण्यावरुन काढण्यात आले असा आरोप भाजपने केला होता. त्या विषयी पवार म्हणाले, आंबील ओढ्याशी माझा काही ही संबंध नाही. प्रशासनाने कारवाई केली. मी कारवाई करण्याचे आदेश दिले, असते तर मी जबाबदारी झटकत नाही. यात अनेकदा राजकारण आणले जाते.

राज्य सरकारने वारी बाबत नियमावली केली होती. त्यामध्ये पारीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची तपासणी बंधनकारक केली होती. त्यामध्ये 306 पैकी 23 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यांच्यात लक्षणे दिसत नव्हती. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

पुणे जिल्ह्यात निर्बंध काय राहणार

पुणे जिल्ह्यात लेवल 3 चे निर्बंध आहेत. पुण्याबाबतच्या बैठकीला पुण्याच्या महापौरांना निमंत्रित केले होते. मी पण पुणेकर आहे माझ्याकडून पुणेकरांचा अपमान होईल असे होणार नाही. पुण्यातील मॉल्स सुरू करण्याबाबत विचार केला होता. परंतु मॉल मधील एसी आणि ग्राहक संख्या मोठी असल्याने ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षा क्लासेसला 4 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे.

लस घेतली असेल तर खेळांना परवानगी दिली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये क्लासेस सुरू करण्याचा विचार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी व इतर स्टाफने लस घेतलेली असावी. पुणे आणि जिल्ह्यासाठी 519 रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत.  जूनच्या रिपोर्ट नुसार पुण्याचा पॅाझिटिव्हिटी रेट वाढला आहे. आता पुण्यात 5.3 टक्के पॉझिटिव्हिटी रेट झाला आहे. त्यामुळे मागील नियम कायम राहतील, या आढवड्यात कोरोनाबधितांची संख्या कोरोना मुक्त होणाऱ्यांपेक्षा जास्त, असल्याचे पवार यांनी सांगितले.   

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com