मिरवणारे बाजूला व्हा अन्‌ काम करणारे पुढे या : अजितदादांनी पुढेपुढे करणाऱ्यांना फटकारले

अजित पवारांसोबत फोटो काढण्यासाठी एकच गर्दी झाली.
Dedication of water tanker at the hands of Ajit Pawar in Baramati
Dedication of water tanker at the hands of Ajit Pawar in Baramati

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जेवढे कडक शिस्तीचे आहेत, तेवढचे ते मिश्किलसुद्धा आहेत. भाषणाला उभे राहिले म्हणजे त्यांच्या फटकाऱ्यांसोबत मिश्किलीसुद्धा अनुभवाला मिळते. आजही बारामतीत एका कार्यक्रमात त्याचा प्रत्यय आला. बारामती परिसरात लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी मोफत टँकरचे लोकार्पण करताना अजित पवारांसोबत फोटो काढण्यासाठी एकच गर्दी झाली. त्यात मिरवणाऱ्या लोकांचीच गर्दी झाल्याने काम करणारे बाजूला राहिल्याचे लक्षात येताच अजित पवार म्हणाले की, ‘मिरवणारे बाजूला व्हा आणि काम करणारे पुढे,’ अशा शब्दांत मिरवणाऱ्या लोकांना फटकारले. (Dedication of water tanker at the hands of Ajit Pawar in Baramati)

तुकाराम भापकर प्रतिष्ठान, पुणे व सायंबाचीवाडी तसेच एनव्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व ग्रामपंचायत यांच्या वतीने लावण्यात आलेल्या झाडांना पाणी पुरवण्यासाठी पाच टँकरचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार यांच्या मिश्किल स्वभावाचे दर्शन झाले. 

अजित पवार हे आपल्या कडक स्वभावासाठी ओळखले जातात. तसेच, ते वेळही काटकोरपणे पाळतात, हे वारंवार दिसून आले आहे. महिनाभरापूर्वी पुण्यात पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीच्या पाहणीवेळी त्यांनी उणिवा आणि त्रूटी पाहून अधिकारी तसेच ठेकेदार यांना खडे बोल सुनावले होते. तसेच, ग्रामीण भागातील भाषणात त्यांच्या मिश्किल स्वभावाचे दर्शन अनेकदा होत असते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. आज सकाळी बारामती परिसरात लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी मोफत टँकरचे वाटप अजित पवार यांच्या हस्ते घेण्यात आला. त्या वेळी फोटो काढण्यासाठी एकच गर्दी झाली आणि मिरवणाऱ्या लोकांची जास्त गर्दी झाल्याने काम करणारे बाजूला राहिल्याचे अजित पवार यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ‘मिरवणारे बाजूला व्हा आणि काम करणारे पुढे या,’ असे फोटोसाठी पुढेपुढे करणाऱ्यांना फटकारले.   

याच वेळी यादगार सोशल फाउंडेशन, बारामती यांच्यातर्फे ५ आरओ प्युरीफायर आणि १ हजार लिटर वॉटर टँकच्या पाच टाक्या दर्गा मशिद, सिध्देश्वर मंदिर, महिला ग्रामीण रुग्णालय, बारामती शहर पोलिस स्टेशन यांना उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा ॲम्ब्युलन्स असोसिएशन यांच्या वतीने १ लाख रुपयांचा धनादेश कोविडसाठी मदत म्हणून सुपूर्द करण्यात आला.

दरम्यान, बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदींची कोरोना आढावा बैठकीत अजित पवार यांनी माहिती जाणून घेतली. बारामती शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा दर ५ टक्क्यांच्या पुढे वाढल्यास निर्बंध कडक करावे लागतील; म्हणून सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी रेट वाढता कामा नये, असे त्यांनी सूचित केलं. 

अजित पवार म्हणाले की, टास्क फोर्सने सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची  शक्यता वर्तवली आहे. त्यादृष्टीने सर्व नियोजन सुरु आहे. उपलब्ध ऑक्सिजनची आवश्यकता वाढण्याची शक्यता गृहित धरून ऑक्सिजनचा साठा ठेवणे आवश्यक आहे. ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत, त्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देणे बंधनकारक करा. लसीकरणाचे नियोजन व्यवस्थित करावे. पहिला डोस घेतलेल्यांनाच प्रथम प्राधान्य द्या. 

बारामतीत एमआयडीसीमधील कंपन्यानी, व्यापारी वर्गांनी नियमांचे काटेकोर पालन करा. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात सोयी-सुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. सर्व रुग्णालयांत ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करावी. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत तरी नागरिकांनी मास्क वापरावा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com