अविश्वास ठरावानंतर चिडलेल्या पंचायत समिती सभापतींचा सदस्यांवर प्राणघातक हल्ला 

शिवसेनेचे (ShivSena) विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते इतर सदस्यांना संधी देत नव्हते.
अविश्वास ठरावानंतर चिडलेल्या पंचायत समिती सभापतींचा सदस्यांवर प्राणघातक हल्ला 
Bhagwan Pokharkar .jpg

राजगुरुनगर : खेड तालुक्यात कोरोनाचा विस्कोट होत असतानाच खेड पंचायत समितीच्या (Khed Panchayat Samiti) सभापती पदावरुन वातावरण अधिकच तापल्याचे चित्र पहायला मिळत आहे.  शिवसेनेचे (ShivSena) विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते इतर सदस्यांना संधी देत नव्हते. त्यामुळे समितीच्या सदस्य असलेल्या सविता सांडभोर यांनी इतर सहा सदस्यांसोबत मिळून पोखरकर यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. त्यानंतर सदस्य सहलीसाठी निघुन गेले, त्याची माहिती सभापती पोखरकर यांना मिळताच त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Deadly attack on Khed Panchayat Samiti members)

पुण्यातील डोंनजे गाव परिसरातील डोंगरावरील एका खासगी रेसॉर्टमध्ये हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. भगवान पोखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ल्या केला आहे. या हल्ल्यात दोनजन गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंचायत समितीसभापतीपदाच्या निवडणुकिवरून हा वाद  सुरु होऊन शिवसेनेतीलच सदस्य एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहे.

खेड पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर यांच्या अविश्वास ठरावावर 31 तारखेला मतदान होणार होते, त्यामुळे ठराव मांडणारे सर्व सदस्य एका खासगी रिसॉर्टमध्ये थांबले आहे. मात्र, ही माहिती पोखरकर यांना मिळाली आणि त्यांनी रात्री आपला भाऊ आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आमच्यावर बंदूक, कोयता आणि लोखंडी गजांनी जीवघेणा हल्ला केला, असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्यांनी केला आहे. या घटनेमुळे खेडचे राजकीय वातावरण तापले असून पुणे ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.    

हे ही वाचा...

गृहमंत्री वळसे पाटलांच्या आंबेगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह दोघांचा खून   

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्या आंबेगाव तालुक्यात (Ambegaon taluka) एकाच दिवशी दोन खून (Two murders) झाले आहेत. त्यातील एक खून तर वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा झाला असून दुसरा खून हा महिलेचा झालेला आहे. या दोन खुनामुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Two murders in Ambegaon taluka on the same day)

आंबेगाव तालुक्यातील पारगाव- अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन राजाराम जाधव ( वय 42, रा. धामणी ता. आंबेगाव) यांचा व्यवसायातील पैशाच्या देवाण घेवाणीतून निर्घुण खून झाला आहे. पोलिसांनी शिताफिने तपास करत अवघ्या चार तासांत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुख्य सुत्रधार त्यांच्या व्यवसायातील भागीदार निघाला आहे.

सचिन जाधव हे मंगळवारी (ता. 25 मे) सायंकाळी सात वाजता घरातून चारचाकी गाडीतून बाहेर गेले होते, ते पुन्हा घरी आले नव्हते. त्यांचा मोबाईलही बंद होता. आज (ता. २६ मे) सकाळी पोंदेवाडीफाटा (ता. आंबेगाव) जवळ काठापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रक्ताचे मोठे डाग पडले होते, त्या ठिकाणी गाडीच्या टायरचे निशाणी दिसली. तसेच, त्या ठिकाणी चप्पल, कंगवा सापडला. त्याठिकाणी गर्दी जमा झाली होती. पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज यांनी चप्पल व कंगवा सचिन जाधव यांचा असल्याचे ओळखल्याने काहीतरी घातपात घडल्याचा संशय बळावला. 

पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने महत्वाच्या सूचना दिल्यानंतर खेड विभागाचे उपविभागीय पोलिस आधिकारी अनिल लंबाते, पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी वेगाने तपास करत दोन तासांत संशयित आरोपीपर्यंत पोचले. एकूण चार आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत, त्यापैकी मुख्य सुत्रधार बाळशिराम थिटे (रा. धामणी ता. आंबेगाव) व विजय सूर्यवंशी ( रा. जुन्नर तालुका) या दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चार तासांत तपास करत या गुन्ह्याचा शोध लावला. 


 

Related Stories

No stories found.