पाणी चोरल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशउपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्या विरोधात गुन्हा..

बांदल आणि त्यांचाभाऊ दररोज सहा टँकर पाणी चोरून नेत असल्याचा आरोप करण्यात आलाआहे.
Sarkarnama Banner - 2021-05-18T122638.256.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-18T122638.256.jpg

शिक्रापूर/पुणे : सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी करत बेकायदा जमीनीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंगलदास बांदल आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शिक्रापूर पोलिस ठाण्यात  मंगलदास बांदल आणि त्याचा भाऊ बापूसाहेब बांदल या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Crime against former NCP state vice president Mangaldas Bandal.

सेवानिवृत्त पोलिस ज्ञानदेव तनपुरे यांनी बांदल यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तनपुरे यांच्या विहिरीतून बांदल आणि त्यांचे भाऊ हे दररोज जबरदस्तीने सहा टँकर पाणी चोरून नेत असल्याचा आरोप तनपुरे यांनी केला आहे.  

मंगलदास बांदल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  प्रदेश उपाध्यक्ष होते. गेल्या वर्षी एका खंडणी प्रकरणात बांदल यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली होती. जमीन बळकावण्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार बांदल यांच्याविरोधात आहे. 

कोपरगाव : वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला होता. त्याला फडणवीसांनी आज उत्तर दिलं होते. फडणवीस म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांनी चांगला सल्ला दिला आहे.  त्यांना हे माहिती नसावं. मी आधीच हे सुरु केलं आहे. नागपूरमध्ये जे काही काम करायचं आहे ते केलं आहे. ” "पत्र लिहण्याच्या भानगडी करीत राज्यभर वणवण फिरण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातच बसावे. तेथे एक-दोन कोविड सेंटर सुरू करुन नागपुरकरांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी," असा सल्ला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस यांना काल दिला होता. 

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com