2Mohan_20Joshi_20_20Murlidhar_20Mohal.jpg
2Mohan_20Joshi_20_20Murlidhar_20Mohal.jpg

`जावडेकर आणि बापट निद्रिस्त आणि मोहोळ यांचे राजकारण लसीच्या आड`

पुण्यातील भाजप नेत्यांना जागे करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन केले जाईल, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला आहे.

पुणे :  सामाजिक बांधीलकी म्हणून पुण्यासाठी कोविशील्ड लसीचे २५ लाख डोस देण्याची तयारी सीरम इन्स्टिट्यूटने दाखविली आहे.  त्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे. तीन आठवडे उलटून गेले तरीही, भाजपचे नेते केंद्र सरकारची परवानगी मिळवू शकलेले नाहीत. त्यांनी येत्या चार दिवसांत परवानगी मिळवावी, अन्यथा कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या पुण्यातील भाजप नेत्यांना जागे करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला आहे. Covishield Congress agitation against BJP Mohan Joshi

कोविड साथ निवारणासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. हे माहीत असतानाही केवळ टक्केवारी आणि अंतर्गत कलह यात भाजपचे नेते गुंतलेले आहेत, या आरोपाचा पुनरुच्चार मोहन जोशी यांनी  केला. सीरमने लस देण्याची तयारी दाखवली असली तरी केंद्राची परवानगी आवश्यक आहे. या परवानगीसाठी लवकरच आम्ही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेणार आहोत, असे विधान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले होते.

दिल्लीत प्रकाश जावडेकर हे वजनदार मंत्री आणि खासदार गिरीश बापट असताना महापौरांनी आरोग्यमंत्र्यांची भेट  घेण्याची गरजच काय ? ही टाळाटाळ करण्यामागे महापौरांचे राजकारण आहे का ? जावडेकर आणि बापट कुंभकर्णाप्रमाणे निद्रिस्त झाले आहेत का? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे. पुणेकरांसाठी एकेक दिवस महत्त्वाचा असताना भाजप नेत्यांची बेफिकीरी संतापजनक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

भाजप नेत्यांनी आपले अंतर्गत कलह बाजूला ठेवून कोविड लस मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि पुणेकरांच्या जिवाशी खेळू नये, असे आवाहन मी केले होते. त्यालाही आठवडा उलटून गेला. तरीही महापालिकेतील सत्ताधारी भाजपची त्यादृष्टीने हालचाल दिसत नाही म्हणून आम्ही घंटानाद आंदोलनाचे पाऊल उचलत आहोत. पुणेकरांना तातडीने लस मिळावी यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करेल, असेही मोहन जोशी यांनी सांगितले.  
Edited by : Mangesh Mahale  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com