अजित पवार, भरणेंना वडेट्टीवारांचे खुले आव्हान; इंदापूरची जागा काँग्रेस लढवणारच 

विधानसभा निवडणुकीनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष हा काँग्रेस असेल.
Congress will contest Indapur seat : Vijay Vattediwar
Congress will contest Indapur seat : Vijay Vattediwar

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून आगामी विधानसभेची जागा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष हा काँग्रेस असेल, असा आत्मविश्वास काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. (Congress will contest Indapur seat : Vijay Vattediwar)

दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार संजय जगताप, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच इंदापूर काँग्रेसच्या जागेवर हक्क सांगून इंदापूर विधानसभेची जागा लढविण्याचे सूतोवाच केले आहे. त्यानंतर आज मंत्री विजय  वडेट्टीवार यांनीदेखील त्याचीच री ओढल्याने महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नाही. आपला पक्ष वाढविण्याचे सर्वांना अधिकार आहेत. मात्र, एकाच मंत्रिमंडळात काम करत असताना काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे कट्टर कार्यकर्ते तथा राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना उघड उघड आव्हान देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजकारणात आज मित्र असलेले येत्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या समोरे उभे ठाकण्याचे संकेत मिळत आहेत. 

हेही वाचा : रिमोट ही आमची वडिलोपार्जित देणगी आहे, तो मी हातातला सोडत नाही

मंत्री वडेट्टीवार हे पूर्वनियोजित सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे काही वेळ थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस लढवणार असल्याचे सूतोवाच केले.
 
हेही वाचा : भाजपला गळती; दोन दिवसांत दोन आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

मंत्री वडेट्टीवार म्हणाले, इंदापूर विधानसभा काँग्रेस पक्ष शंभर टक्के लढवणार असून तालुक्यात पक्षसंघटन मजबूत होणे गरजेचे आहे. इंदापूर तालुका हा काँग्रेसला मानणारा तालुका आहे. मात्र, मध्यंतरी काही अनपेक्षित घडामोडी घडल्यामुळे काँग्रेसचा जनाधार कमी झाला आहे. मात्र, पक्षाने इंदापूर तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला जोरदार पाठिंबा मिळत असून काँग्रेस पक्ष मजबुतीने उभा होत आहे.त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष राज्यात असेल. 

या वेळी विधान परिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, डॉ.संतोष होगले, इंदापूर विद्यार्थी संघटना अध्यक्ष शंभूराजे साळुंखे, निवास शेळके, महादेव लोंढे, दत्तात्रेय देवकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com