स्वबळाची भाषा करणाऱ्या पटोलेंना आढळरावांचा चिमटा : कॉंग्रेसला आघाडीशिवाय पर्याय नाही

शिवसेनेच्या या भूमिकेमुळे कॉग्रेसमधून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागणार आहे.
Congress has no choice but to lead in upcoming elections : Adhalrao Patil
Congress has no choice but to lead in upcoming elections : Adhalrao Patil

राजगुरुनगर (जि. पुणे) : कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचे पडसाद महाविकास आघाडीतील घटक पक्षात पडायला सुरुवात झाली आहे. त्याबाबत बोलताना शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पटोले यांना चिमटा काढला आहे. राज्यात महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची आघाडी अभेद्य असून ती कायम रहाणार आहे. आता कॉंग्रेस पक्ष स्वतंत्र लढण्याची भाषा करत असेल. मात्र, कॉंग्रेस पक्षाला पुढील काळात आघाडीशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत माजी खासदार आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. (Congress has no choice but to lead in upcoming elections : Adhalrao Patil)
 
दरम्यान, आगामी निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला आघाडीशिवाय पर्याय नसल्याचे सांगत शिवसेना नेते आढळराव पाटील यांनी ही महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. माजी खासदार आढळराव पाटील यांनी पुणे-नाशिक महामार्गावरील बाह्यवळणाच्या कामाच्या पाहणीदरम्यान माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी आघाडीबाबत वरील भाष्य केले. 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले होते. त्याबाबत बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, कॉंग्रेसमधील काही नेते स्वबळाची भाषा करत आहे. मात्र, पुढील काळात कॉंग्रेस पक्षाला आघाडीशिवाय पर्याय राहिलेला नाही, असं म्हणत आढळराव पाटलांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड तालुक्यातील राजगुरुनगर आणि जुन्नर तलुक्यातील नारायणगाव या दोन्ही शहरांच्या बाजूला सुरु असलेल्या बायपास व पुलाच्या कामांची पाहणी आज (ता. ३ जून) शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. या वेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामदास धनवटे, विजया शिंदे, सुरेश चव्हाण, अशोक खांडेभराड, ज्योती अरगडे हे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साम टीव्हीला मुलाखत दिली. त्यात पटोले यांनी आगामी विधानसभा कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये पडायला सुरुवात झाली आहे. नाना पटोले यांच्या स्वबळावर लढण्याच्या विधानाला शिवसेनेकडून लक्ष्य करत शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी कॉंग्रेसला पुढील काळात राज्यात आघाडीशिवाय पर्याय नसल्याचे सांगत चिमटा काढला. आता शिवसेनेच्या या भूमिकेमुळे कॉग्रेसमधून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com