बसस्टँडसाठी ७ एकर जमीन देणारे स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार पाटसकरांचा काँग्रेसला विसर

अशा त्यागी वृत्तीचे स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे दिवंगत आमदार पाटसकर यांच्या कुटुंबीयांचा काँग्रेसला विसर पडलेला दिसत आहे.
Congress forgotten by Freedom fighter, former MLA Jagannath Patskar
Congress forgotten by Freedom fighter, former MLA Jagannath Patskar

केडगाव : काँग्रेस पक्षाच्या ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानाला दौंडचे स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसचे माजी आमदार जगन्नाथ पाटसकर यांचा विसर पडल्याने दौंड तालुक्यातून नाराजी व्यक्त होत आहे. पाटसकर यांनी दौंडमधील ग्रामीण रूग्णालय आणि एसटी बसस्थानक उभारण्यासाठी स्वतःची साडेसात एकर जमीन दिली होती. (Congress forgotten by Freedom fighter, former MLA Jagannath Patskar)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानास रविवारी (ता. १ ऑगस्ट) टिळकवाड्यातून सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पुण्यताील ज्येष्ठ आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी स्वातंत्र्यसैनिकांची मुले, नातवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे पाटसकर कुटुंबीयांना साधे निमंत्रणसुद्धा देण्यात आलेले नाही. 

जगन्नाथ पाटसकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चार वेळा तुरूंगवास भोगला, भूमिगत राहिले. १९४२ स्वातंत्रलढ्यात राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण व पाटसकर हे एकाच तुरूंगात होते. पाटसकर व चव्हाण हे जीवलग मित्र होते. पाटसकर हे निरपेक्ष व त्यागी कार्यकर्ते होते. अशा त्यागी वृत्तीचे स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे दिवंगत आमदार पाटसकर यांच्या कुटुंबीयांचा काँग्रेसला विसर पडलेला दिसत आहे. 

दौंडमधील ग्रामीण रूग्णालय व एसटी बस स्थानक उभारण्यासाठी स्वतःची साडेसात एकर जमीन दिली होती. त्याबदल्यात राज्य सरकार त्यांना घर बांधून देणार होते. मात्र, घराचा प्रश्न गेली ३० वर्ष भिजत पडला आहे.  गेली पंधरा दिवस ‘सरकारनामा’ने पाटसकर यांच्या घराचा प्रश्नाला पुन्हा वाचा फोडली आहे. त्यामुळे हा विषय चर्चेत असताना, पुण्यातील काँग्रेसच्या धुरिणांना हा विषय माहित असतानाही पाटसकर यांचा विसर पडणे, याचे दौंडकरांना आश्चर्य वाटत आहे. 

‘सरकारनामा’ने याबाबत पाटसकर कुटुंबीयांशी संपर्क साधला असता या कार्यक्रमाची कोणतीही कल्पना त्यांना नव्हती. पाटसकर कुटुंबीयांनी पुण्यातील काँग्रेसच्या नेतेमंडळींकडे याबाबत विचारले असता त्यांनी दुसऱ्या यादीत पाटसकर कुटुंबीयांचा सत्कार केला जाईल, असे सांगत वेळ मारून नेली आहे. काहीही असले तरी पाटसकर कुटुंबीयांना पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही, हे खरे. 

या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, राज्यमंत्री विश्वजीत कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, टिळक विद्यापीठाचे कुलपती डॅा. दीपक टिळक, अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, गटनेते आबा बागूल उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com