सहकारातील ज्येष्ठ  नेते बाळासाहेब शेटे यांचे निधन  - co-operative leader Balasaheb Shete passed away | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

सहकारातील ज्येष्ठ  नेते बाळासाहेब शेटे यांचे निधन 

राजेंद्र लोथे
शुक्रवार, 25 जून 2021

वाडा गाव वसविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती, त्यामुळे त्यांना वाडा गावचे संस्थापक म्हटले जाते. 

चास : वाडा ( ता. खेड ) गावचे संस्थापक व सहकारातील ज्येष्ठ नेते, शरद पवार यांचे निकटवर्तीय वाडा गावचे माजी सरपंच, पंचायत समितीचे माजी सभापती, जिल्हा दुध संघाचे माजी संचालक तसेच जिल्हा बँकेचे माजी संचालक बाळासाहेब महादेव शेटे(वय ७३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  अत्यंत मितभाषी, सडेतोड, स्पष्टवक्ते असणारे शेटे आण्णा यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जिल्हा दुध संघाचे संचालक चंद्रशेखर शेटे यांचे ते वडील तर भिमाशंकर पतसंस्थेचे अध्यक्ष रोहिदास शेटे यांचे ते बंधू होत. co-operative leader Balasaheb Shete passed away

बाळासाहेब शेटे उर्फ शेटे आण्णा यांनी सहकार खर्ऱ्या अर्थाने खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात रूजवला. वाडा गावचे सरपंच म्हणून 1974 ते 1991 पर्यंतचे सलगपणे त्यांनी गावचे सरपंचपद भुषवले. चास कमान धरणात वाडा गाव बुडीत क्षेत्रात गेल्यावर नव्याने 1991-92 मध्ये वाडा गाव वसविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती, त्यामुळे त्यांना वाडा गावचे संस्थापक म्हटले जाते. 

नवीन वाडा गाव वसवल्यावर 1992-1993 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते वाडा गावचे उद्धघाटन झाले होते. 1992 ते 1997 या कालावधीत खेड पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. 1993 ते 2015 या कालावधीत पुणे जिल्हा दुध संघाचे संचालक व त्याच दरम्यान काही काळ ते जिल्हा दुध संघावर अध्यक्षही होते. 2007 ते 2015 या कालावधीत त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सह बँकेत संचालक म्हणूनही त्यांनी आपल्या कामाची चुणुक दाखवली होती. 

आपल्या गावासह परिसरातील नागरिकांना बचतीबरोबरच गरजेच्या वेळेस पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी  1997 मध्ये भिमाशंकर पतसंस्थेची स्थापना केली. आजही हि पतसंस्था दिमाखात सुरू आहे. 2015 नंतर आपले चिंरंजीव चंद्रशेखर शेटे यांना सहकारात आणून जिल्हा दुध संघावर संचालक केल्यावर त्यांनी सक्रिय राजकारणातून काहीशी एक्झिट घेतली होती, मात्र, सहकारात प्रत्येक बाबतीत मार्गदर्शन करण्यात ते आजही सक्रिय होते. 
 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख