बीडमध्ये सध्या गुंडाराज चालू आहे! 

पूजा चव्हाणच्या प्रकरणातही असाच तपास पुणे पोलिसांनी का केला नाही.
 Chitra Wagh .jpg
Chitra Wagh .jpg

पुणे : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आज (ता. ८ सप्टेंबर) पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन वानवडी बलात्कार प्रकरण (Wanwadi Rape Case) संदर्भात माहिती घेतली. पुणे पोलिसांनी या प्रकरणात योग्य तपास केला असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांचे कौतुक केले. मात्र, पूजा चव्हाणच्या प्रकरणातही असाच तपास पुणे पोलिसांनी का केला नाही असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला. (Chitra Wagh meet to Pune Police Commissioner Amitabh Gupta) 

वाघ यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यांशी संवाद साधला. त्यावेळी करुणा शर्मा प्रकरणाबद्दल वाघ म्हणाल्या की, बीडमध्ये सध्या गुंडाराज चालू आहे. पोलिसांनी जी कारवाई केली ती कोणत्या आधारे केली. याची माहिती त्यांनी देणे गरजेचे आहे. करुणा शर्मा बाबात सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप वाघ यांनी केला. 

पुण्यातील कदमवाकवस्तीमध्ये सरपंच गौरी गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी सुजित काळभोर यांनी मारहाण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणावरुन सध्या वेगवेगळे खुलासे केले जात आहेत. त्या विषयी वाघ म्हणाल्या, पूर्ण सीसीटीव्ही फुटेज देऊन या प्रकरणाची चौकशी करावी. जर एखादा पुरुष महिलेला मारहाण करत असेल तर महिला गप्प बसणार नाही. कदमवाकवस्ती या ठिकाणचे लसीकरण केंद्र का बंद केले गेले याचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी द्यावे, अशी मागणी वाघ यांनी केली. अजित पवार यांची काम करण्याची पद्धत पूर्णतः मला माहित आहे. त्यामुळे दादांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे वाघ म्हणाल्या. या प्रकरणात कुठलेही राजकारण केले गेले नाही. किंवा गौरी गायकवाड या भाजपच्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले. 

वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्या विषयी वाघ म्हणाल्या, पूजा तडस तिच्याबरोबर माझे फोनवरती बोलणे झालेले. पूजाचा संसार वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तडस यांचा तो घरगुती वाद आहे, असे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com