चेतन तुपेंना हडपसर मतदार संघाचा विकास करायचा नाही : योगेश टिळेकर  - Chetan Tupe does not want to develop Hadapsar constituency Yogesh Tillekar | Politics Marathi News - Sarkarnama

चेतन तुपेंना हडपसर मतदार संघाचा विकास करायचा नाही : योगेश टिळेकर 

महेश जगताप
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

चेतन तुपे यांनी शेतकऱ्यांना भडकावून तुम्ही दुप्पट , तिप्पट पैसे मागा अशी फूस लावली आणि तो रस्ता अर्धवट पडला आहे.

पुणे : "हडपसरचे आमदार चेतन तुपे यांना कोंढवा भागाचा विकास करायचा नाही, त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या मतदार संघाचाही विकास करायचा नाही," असे भाजप ओबीसी मोर्चाचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष  व हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले. टिळेकर यांची मुलाखत 'सरकारनामा'मध्ये नुकतीच प्रसारित करण्यात आली. यावेळी तुपे यांच्यावर टिळेकर यांनी हडपसर मतदार संघातील प्रश्नांवरून जोरदार टीका केली.

ज्या प्रश्नावरून  गेली पंचवीस वर्षे  हडपसर मतदार संघात आरोप-प्रत्यारोप  होत आहेत. तो प्रश्न म्हणजे कोंढवा -कात्रज रस्ताहोय . मी आमदारकीच्या काळात हा रस्ता मार्गी लावला होता, पण दुर्देवाने माझा मतदारसंघात पराभव झाला आणि पुन्हा त्या रस्त्यावरून राजकारण सुरू झाले. रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करायच्या असतील तर त्यांना एफएसआय व टीडीआर यानुसार यानुसार पैसे देत असतो, मात्र, तुपे यांनी शेतकऱ्यांना भडकावून तुम्ही दुप्पट , तिप्पट पैसे मागा अशी फूस लावली आणि तो रस्ता अर्धवट पडला आहे. मुळात तुपे यांना कोणतेही काम करायचं नाही, मतदार संघात विकास होऊ द्यायचा नाही, अशीच त्यांची आजपर्यंत भूमिका राहिली आहे. 

नुकतेच पाण्याच्या विषयावर केलेल्या आंदोलनाबाबत टिळेकर म्हणाले की आम्हाला राष्ट्रवादी ,काँग्रेस च्या गेली १५ वर्षाच्या काळात कायम पाण्यासाठी आंदोलन करावे लागले. त्यामुळे आम्ही सत्तेत आल्यानंतर तीन नव्याने टाक्या बांधल्या पण आज पाण्याचं वितरण योग्य प्रमाणात करण्यात प्रशासन कमी पडत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात आम्ही मोर्चा काढला होता. ही आमची नैसर्गिक प्रतिक्रिया होती असे मत टिळेकर यांनी व्यक्त केले.  

कार्यकर्त्यांसह मलाही अटक करण्यात आली. त्यावेळी माझा पक्ष माझ्यापाठीमागे ठामपणे उभा राहिला. सर्वांनी मला या काळात आधार देण्याचा प्रयत्न केला. आम्ही या पक्षात काम करताना एक कुटुंब म्हणून काम करतो. 

खडसे यांनी भाजप पक्ष सोडला आहे त्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांवर भाजपमध्ये अन्याय होत आहे, असा सूर जनमानसात उमटत आहे हे खरे आहे का ? या प्रश्नाला उत्तर देताना जर अन्याय होत असता तर टिळेकर हा विधानसभेत गेला नसता . भारतीय जनता पक्ष जात-पात, नाव न पाहता त्या व्यक्तीची कार्यक्षमता पाहून योग्य संधी देत असतो. आजही भाजपच्या १०५ आमदारांपैकी ३७ आमदार हे ओबीसी आहेत. त्याचबरोबर ओबीसी मतदार ही पक्षासोबत आहे. त्यामुळे हे साफ खोट आहे, असे टिळेकर यांनी सांगितले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख