पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला सीईओ सोहनी यांचे निधन

सोहनी या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी होत्या.
 Charushila Sohni .jpg
Charushila Sohni .jpg

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी (सिईओ) चारुशीला सोहनी (Charushila Sohni) यांचे मंगळवारी (ता. १४ सप्टेंबर) दीर्घ आजाराने दिल्लीत निधन झाले. त्या ७४ वर्षाच्या होत्या. (Charushila Sohni passes away)    

सोहनी या २१ मे १९८१ ते २९ मार्च १९८२ या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी होत्या. तेव्हा दिवंगत माजी मंत्री बापूसाहेब थिटे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. गणपतराव आवटी उपाध्यक्ष आणि राज्याचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे वडील कै. दत्तात्रेय वळसे-पाटील हे बांधकाम आणि आरोग्य समितीचे सभापती होते. 

परिषदेच्या स्थापनेनंतर १९ वर्षांनी १९८१ ला सोहनी यांच्या रुपाने पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी लाभल्या होत्या. त्यानंतर १९९८ मध्ये व्ही. राधा या जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. तेव्हापासून आजतागायत पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी  महिलेला संधी मिळालेली नाही. 

भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९७१ च्या तुकडीतील सोहनी या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी होत्या. त्या ३० नोव्हेंबर २००७ ला केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिव पदावरून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर बुधवार (ता. १५) दुपारी नवी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Edited By - Amol Jaybhaye   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com