चंद्रकांतदादा म्हणाले, ''भाजपच्या नेत्यांचीही चैाकशी व्हायला पाहिजे''

आमच्या सरकारच्या काळातील प्रकरणं काढायला आम्ही कुणालाही अडवलेलं नाही.
1patil_33.jpg
1patil_33.jpg

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर (Jarandeshwar Sugar Factory )कारखान्यावर ईडीने नुकतीच कारवाई केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं (ED) हा साखर कारखाना जप्त केला. त्यानंतर राजकीय वर्गातून या कारवाईवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील ५४ कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्यासंदर्भात आज अमित शाह यांना पत्र लिहिणार आहेत. ते माध्यमांशी बोलत होते. Chandrakant Patil will write a letter to Amit Shah Sugar Factory

चंद्रकांत पाटील पाटील म्हणाले की, राज्यातील ५४ कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्यासंदर्भात अमित शाह यांना आज पत्र लिहणार आहे. यामध्ये सर्वांची चौकशी झाली पाहिजे, मग भाजपचे नेते असले तरीही त्यांची चैाकशी व्हायला पाहिजे. मी पत्र लिहू नये हिच अजित पवार यांची हुकूमशाही आहे. आमच्या सरकारच्या काळातील प्रकरणं काढायला आम्ही कुणालाही अडवलेलं नाही. 

शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्याची भेट घेतल्याची चर्चा आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राऊतांनी भाजप नेत्यांची भेट घेतली का मला माहिती नाही, पण सध्या उद्धव ठाकरे त्यांनाच पुढे करीत आहेत.  

‘‘जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर त्याच्या व्यवहारांची कागदपत्रे उघड झाली आहेत. जरंडेश्वर हे या गैरव्यवहाराच्या बाबतीत हिमनगाचे टोक आहे. यादी मोठी आहे आणि सर्व रडारवर आहेत.’’ असे चंद्रकांत पाटील काल म्हणाले.

बंडा तात्यांना अटक करून सरकारने काय साधले?
पुणे :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पायी वारीला परवानगी नाकारली आहे. पायी वारी करण्यावर ठाम असलेल्या बंडा तात्या कराडकर Banda Tatya Karadkar यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता राजकारण तापू लागलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत टि्वट करीत फडणवीस यांनी सरकारचा निषेध केला आहे.  
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com