चंद्रकांतदादा म्हणतात दरेकरांच्या मनात तो अर्थ नाही 

राष्ट्रवादी उगाच वेड पांघरून पेडगावला जात आहे.
Chandrakant Patil, Praveen Darekar .jpg
Chandrakant Patil, Praveen Darekar .jpg

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरिबांकडे बघायला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असे विधान केले होते. त्याबद्दल दरेकर यांनी महिलांची जाहीर माफी मागावी; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस हा महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगविणाराही पक्ष आहे, हेसुद्धा आपण लक्षात ठेवावे, असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दरेकर यांना दिला होता. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दरेकरांच्या विधानावरुन इतका गदारोळ करण्याची गरज नाही, असे म्हटेल आहे.(Chandrakant Patil said on the statement of Praveen Darekar)  

पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी पाटील म्हणाले की, दरेकरांच्या मनात कोणताही अश्लील अर्थ नाही. तसे असण्याचे काही कारणच नाही. राष्ट्रवादी उगाच वेड पांघरून पेडगावला जात आहे. मराठीत बरेच वाक्यप्रचार वरचेवर अगदी सहजपणे आपण उच्चारत असतो. त्याचा जर फिजिकली अर्थ घ्यायचा झाला तर हे वेड पांघरून पेडगावला जाण्यासारखे होईल. अशी वाक्ये फक्त एखादा विषय समजावण्यासाठी म्हटली जातात. गरिबांच्या कल्याणाचे तुम्हाला काही पडलेले नाही.

श्रीमंत व राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेल्यांची तुम्हाला अधिक काळजी आहे, असे सांगण्यासाठी दरेकर यांनी ते विधान केले. त्यावरून गदारोळ करण्याचे कारण नाही. मात्र, महाविकास आघाडीचे पक्ष सध्या पॅनिक झालेत. तीन-तीन पक्ष एकत्र असल्याने असा हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करतात. प्रवीण दरेकर किंवा आमच्या कोणाच्याही मनात कोणताही अश्लील अर्थ नाही, असे पाटील यांनी सांगितले. 

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या होत्या? 

चाकणकर म्हणाल्या की, विधान परिषद ही ज्येष्ठ, अभ्यासू आणि वैचारिक लोकांचे सभागृह म्हणून ओळखले जाते. पण, आपण आज शिरूरमध्ये जे विधान केले, त्यावरून असे दिसतंय की आपला ह्या वैचारिकतेशी दूरदूरचा कोठेही संबंध दिसत नाही. आपण जे वाक्य उचारले, ते वाक्य उचारायला मला खरे तर लाज आणि संकोच वाटतो. आपण जर जाहीर सभेत बोलत असाल तर आम्हालाही बोलणे गरजेचे आहे. आपण बोललात की राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे. या विधानातून प्रवीण दरेकर यांनी आपली वैचारिक दरिद्रता आपण संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. 
 
ज्या पद्धतीने आपल्या बोलण्यातून ही घाण टपकतेय, ती भाजपची वैचारिक बैठक आणि संस्कृती आहे. महिलांना दुय्यम लेखणे, हा तुम्ही पाडलेला पायंडा आहे. तुमच्या पक्षातील महिला बाहेर फिरताना सांगतात की ‘आम्ही महिलांच्या कैवारी आहोत,’ त्यांनीही दरेकर यांच्या विधानाचा विचार करावा, असा टोला चाकणकर यांनी नाव न घेता चित्रा वाघ यांना लगावला आहे. 

Edited By - Amol Jaybhaye
   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com