चंद्रकांतदादा म्हणाले, माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेलच! 

पाटील यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.
चंद्रकांतदादा म्हणाले, माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेलच! 
Chandrakat Patil .jpg

पुणे : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakat Patil) सतत नव्यानव्या विधानांमुळे चर्चेत असतात. तसेच त्यांनी आज (ता. १६ सप्टेंबर) पुण्यात बोलताना केलेल्या एका नव्या विधानामुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असे सांगत एक प्रकारे राजकारणात स्फोट होणार असल्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत. (Chandrakant Patil said don't say former minister) 

देहूगाव येथील एका खाजगी कार्यक्रमात सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. तेंव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असे पाटील म्हाणाले. 

पाटील यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. तसेच पाटील यांच्या वक्तव्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. देहू गावात एका खाजगी दुकानाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तेव्हा सूत्रसंचालक नियमीत माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख करत होता. तेव्हा त्यांनी सूचक विधान केले.  

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी भाजपशी युती करणे हाच पर्याय, असा लेख लिहिल्याने राजकारणात अनेकांना धक्का बसला आहे. स्थापनेपासून आजपर्यंत केवळ आणि केवळ संघ-भाजप रडारवर असताना, खेडेकर यांनी थेट भाजपशी युती करण्याचे भाष्य केल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली. भाजपकडून असा कोणताही निर्णय अद्यापपर्यंत नाही. त्यांची ऑफर काय आहे ते बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल, असे पाटील म्हणाले. 

Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in