प्रदीप शर्मा अटकेप्रकरणी चंद्रकांतदादांनी शिवसेनेवर टीका का टाळली?

...तरीही भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली
Chandrakant Patil refrained from criticizing Shiv Sena over Pradip Sharma arrest
Chandrakant Patil refrained from criticizing Shiv Sena over Pradip Sharma arrest

पुणे :  माझं अशा प्रकरणांबाबत असं मत आहे की कोणी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली (एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी नालासोपऱ्यातून शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती) आणि पुढं तो कोणत्या गुन्ह्यात सापडला, तर त्यासाठी त्या पक्षाला दोष देण्यात अर्थ नसतो. त्या माणसाची काळी बॅग्राऊंड तो त्या पक्षात येतो, तेव्हा माहिती असतेच असे नाही, असे सांगून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अटकेबाबत शिवसेनेवर टीका करण्याचे टाळले. (Chandrakant Patil refrained from criticizing Shiv Sena over Pradip Sharma arrest)

दरम्यान, एनआयएने ही कारवाई केली आहे. त्याबद्दल आपण काय बोलणार? असा सवालही त्यांनी पत्रकारांना केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी मुंबईत बुधवारी (ता. १६ जून) झालेल्या भाजप-शिवसेना वादावर वरील भाष्य केले. लोकशाहीत निदर्शनेही करायची नाहीत का? ‘सामना’मधे तुम्ही काहीही लिहिता. त्याला काही आधार नसतो. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात काही दगडगोटे नव्हते. तरीही भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला. 

भाजप आणि शिवसेनेत काल झालं ते क्लेशकारक होतं. असं व्हायला नको होतं. एखाद्या कुटुंबात नवरा-बायको रात्री भांडतात आणि सकाळी एकत्र चहा पिताना दिसतात. पण,  राजकारणात एखादा विषय लगेच संपत नाही, असे सांगून मुंबईतील कालच्या मारहाणीच्या प्रकरणावर भाजप एवढ्यात पडदा टाकणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले.

राज्यातील विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांच्या पुडीवर किती बोलायचं? असा प्रश्न करत चंद्रकांतदादा म्हणाले की ‘वाढदिवसाला शुभेच्छा देणं ही आपली संस्कृती आहे. शत्रू असला तरी आपण शुभेच्छा देत असतो,’ अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छांवर आपली प्रतिक्रिया दिली. 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात लवकरात लवकर फेरविचार याचिका दाखल करावी. मराठा समाजाला आरक्षण देणे आणि ओबीसी आरक्षण हे प्रश्न सोडविण्यासाठी एकाच मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात यावी. तसेच, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशीही मागणी त्यांनी केली.

मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी लागणारी अतिरिक्त फी सरकारने भरावी. मराठा समाजातील एकवीसशे उमेदवारांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशा उपाय योजनाही चंद्रकांत पाटील यांनी सरकारला सूचविल्या. तसेच, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे लढतायत, मग ते उदयनराजे असतील, संभाजीराजे असतील किंवा नरेंद्र पाटील असतील, या सर्वांना आमचा पाठींबा असेल, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी बोलताना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com