चंद्रकांतदादा आमच्याबाबत खोटे बोलले 

चंद्रकांत पाटील यांचे ते वक्तव्य धांदात खोटे आणि राजकीदृष्ट्या केलेले आहे.
Chandrakant Patil lied about Baramati Bazar Samiti
Chandrakant Patil lied about Baramati Bazar Samiti

बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल (ता. 12 ऑक्‍टोबर) चौफुला (ता. दौंड, जि. पुणे) येथे एक वक्तव्य केले होते. त्याबाबत समितीकडून आज (ता. 13 ऑक्‍टोबर) स्पष्टीकरण देण्यात आले. चंद्रकांत पाटील यांचे ते वक्तव्य धांदात खोटे आणि राजकीदृष्ट्या केलेले आहे, असे समितीचे सभापती अनिल खलाटे, उपसभापती बाळासाहेब पोमणे यांनी सांगितले. 

बारामती बाजार समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पर्यायाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेली अनेक वर्षे निर्विवाद वर्चस्व आहे.

आमदार पाटील यांनी बारामती बाजार समितीमार्फत समितीच्या बाहेर शेतकऱ्यांकडून सेस गोळा केला जातो, असे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आज बारामती तालुक्‍यात उमटले. त्यानंतर बाजार समितीने पाटील यांचे वक्तव्य वक्तव्य धादांत खोटे असून राजकीयदृष्ट्या खोटे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. 

या बाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात खलाटे व पोमणे यांनी नमूद केले आहे की, बारामती बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठीच सातत्याने कार्यरत असते. समितीत शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. समिती आवाराबाहेर शेतकरी किंवा व्यापाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा मार्केट सेस वसूल करीत नाही किंवा तसे काही परित्रकही काढले नाही. उलट बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले आहे. 

बाजार आवारात व्यापार वाढविणे, खरेदी दारात स्पर्धा वाढून शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दर मिळणे, अचूक वजनमाप, त्याच दिवशी शेतकऱ्यांना पट्टी, लिलावापूर्वी शेतीमालाचे वजन, ऑनलाइन लिलाव पद्धतीद्वारे ई-ऑक्‍शन प्रणाली, रेशीम कोष खुली बाजारपेठ खरेदी विक्री केंद्र या बाबी बाजार समितीने राबविल्या आहेत. 

या शिवाय इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा, आधुनिक सुसज्ज जनावर बाजार, श्रमजीवीसाठी हमाल भवन, भव्य सेल हॉल, निर्यात सुविधा केंद्र यासह अनेक सुविधा पुरविल्या जात आहेत. चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य करणे दुर्देवी आहे, असेही सभापती अनिल खलाटे, उपसभापती बाळासाहेब पोमणे यांनी नमूद केले आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com