Sanjay Raut, Chandrakant Patil  .jpg
Sanjay Raut, Chandrakant Patil .jpg

'मुंबई अभी बाकी है' म्हणत चंद्रकांतदादांचा शिवसेनेला इशारा 

सोशल मीडियावर भाजपकडून ट्रेंड केले जात आहे बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है.

पुणे : बेळगाव महापालिका (Belagavi Municipal Corporation) निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला आहे. निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला होता. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. (Chandrakant Patil criticizes Sanjay Raut) 

सोशल मीडियावर भाजपकडून ट्रेंड केले जात आहे बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, याबाबत पाटील यांना विचारले असता. पाटील म्हणाले, बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही. मात्र, मुंबई बाकी आहे आणि ती सोडणार नाही. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही म्हटलो होतो. दोन का एक नगरसेवकावरुन थेट आम्ही 51 वर गेलो. त्यावेळी आम्ही सांगितले होते की आम्ही ज्या स्टाईलने हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार. असे थेट आव्हान पाटील यांनी शिवसेनेला दिले. बेळगावात भाजपचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यात निम्म्यापेक्षा जास्त मराठी भाषिक असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

खोटे बोल पण रेटून बोल. सकाळी एक बोलायचे दुपारी एक. त्यांना बहुतेक अल्झायमर सुरु झाल्याचे दिसत आहे, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला. ते क्लिअर कट अस म्हणाले की आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही तर कोथळाच काढतो. ते पोलिस बघतील. पण पोलिस त्यांच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे ते करतील माहिती नाही. मात्र, आमच्या पुण्याच्या अध्यक्षांनी तर तक्रार दाखल केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

बेळगाव सीमा वादाबाबत पाटील म्हणाले, वर्षानुवर्षे आमचा मुद्दा हा आहे की, दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसणे वाढवले पाहिजे. हा न्यायालयीन विषय आहे तो कधी सुटेल तेव्हा सुटेल. तोपर्यंत तिथल्या मराठी भाषिकांना सन्मानाचे जीवन जगता आले पाहिजे. भाजपची एकच भूमिका आहे की, हा सगळा मराठी भाषिक भाग आहे आणि तो महाराष्ट्राला मिळाला पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले.  

दरम्यान, भाजपने या निवडणुकीत अतिशय आक्रमकरित्या प्रचार केला होता. आता पर्यंत भाजपचे ३६ उमेदवार विजयी झाली आहेत. काँग्रेस 8 तर, अपक्ष 7 उमेदवार विजयी झाले आहेत. एआयएमआयएमने एका जागेवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्र एकिकरण समितीला ३ जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. 

पहिल्यांदाच पक्षपातळीवर लढल्या गेलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस या पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. भाजप, काँग्रेस बरोबर आप, एमआयएम, निधर्मी जनता दल देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी बीके मॉडेल हायस्कूल येथे सुरु आहे. येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्च केला आहे.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com