चाकणमध्ये शिवसेनेने अवघ्या दोन महिन्यांसाठी निवडला नवा नगराध्यक्ष 

नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. चाकणमध्ये भाजपचा फक्त एक नगरसेवक आहे.
In Chakan, Shiv Sena elected a new nagradaksha for just two months
In Chakan, Shiv Sena elected a new nagradaksha for just two months

चाकण (जि. पुणे) : खेड तालुक्‍यातील चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या स्नेहा नितीन जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रिक्त नगराध्यक्षपदासाठी जगताप यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. 

दरम्यान, नगरपरिषदेचा पंचवार्षिक कालावधी संपत आला आहे, त्यामुळे नवनिर्वाचित नगराध्यक्षा जगताप यांना फक्त दोन महिने या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत नगराध्यक्ष म्हणून तीन जणांनी काम केले आहे. 

याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेडचे प्रांताधिकारी संजय तेली, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी दिली. नगराध्यक्ष शेखर घोगरे यांनी दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. 

निवडणूक होण्याअगोदर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष हृषिकेश झगडे जबाबदारी सांभाळत होते. शिवसेनेच्या स्नेहा जगताप या नगराध्यक्षा झाल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे शिवसेनेकडे आली आहेत. 

नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. चाकणमध्ये भाजपचा फक्त एक नगरसेवक आहे. कोरोनाच्या साथीत सोशल डिस्टन्सिंग पाळून निवडणूक घेण्यात आली. काही नगरसेवकांनी ऑनलाईन निवडणुकीचे कामकाज पाहिले. 

या वेळी उपनगराध्यक्ष झगडे, नगरसेवक राजेंद्र गोरे, नीलेश गोरे, प्रवीण गोरे, मंगल गोरे, सुजाता मंडलिक, धीरज मुटके, हुमा शेख आदी उपस्थित होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी मात्र नगराध्यक्ष निवडणुकीकडे पाठ फिरविली होती. नवनिर्वाचित नगराध्यक्षा जगताप यांना फक्त दोन महिने या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर नगरपरिषदेचा कालावधी संपत असल्याने पंचवार्षिक निवडणुका होणार 
आहेत. 

हेही वाचा : पुणे झेडपीतील वाद : अजित पवार विरुद्ध खासदार संजय राऊत "सामना' रंगण्याची चिन्हे 

राजगुरूनगर : खेड तालुका पंचायत समितीच्या नवीन इमारतीवरून खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते आणि माजी आमदार सुरेश गोरे यांच्यामध्ये धुमसणारा वाद आता मुंबईत उच्च राजकीय स्तरावर पोहचला असून, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांचाही या वादनाट्यात प्रवेश झाला असल्याने, आता राऊत विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असा सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

पंचायत समितीच्या नवीन मंजूर इमारतीचे काम सध्या निश्‍चित केलेल्या जागेवर करण्याचे थांबवावे आणि मूळ पंचायत समितीच्या परिसरातच ही इमारत बांधण्यासाठी नव्याने प्रक्रिया सुरू करावी, असे तोंडी आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 19 फेब्रुवारी रोजी राजगुरूनगर भेटीत अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे काम सुरु होता होता थांबले. 

आता सुरेश गोरे यांच्या विनंतीवरून खासदार संजय राऊत यांनी, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना एक सप्टेंबर रोजी एक पत्र देऊन, हे काम पूर्वीच्या मंजुरीप्रमाणे ठरलेल्या जागीच, अगोदरच दिलेल्या कार्यारंभ आदेशाप्रमाणे त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावेत, असे सांगितले. त्यानुसार सत्तार यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ताबडतोब काम सुरु करण्याचे आदेश दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com