पुण्यातील उद्योजक पाषाणकरांसह तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा

फ्लॅट घेण्यासाठी संबधीत तक्रारदाराने त्यांना अडीच कोटींची रक्कम दिली होती.
Sarkarnama (97).jpg
Sarkarnama (97).jpg

पुणे :  पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर  Gautam Pashankar यांच्यासह तिघांवर फसवणूक तसेच मारहाण केल्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलिसांनी Pune Police दाखल केला आहे. दीप पुरोहित, गौतम पाषाणकर व रिनल पाषाणकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 43 वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. 2 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.   

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गौतम पाषाणकर गायब झाले होते. जाताना त्यांनी सुसाईड नोटसारखी एक चिट्ठी देखील लिहून ठेवली होती. मात्र, अखेर त्यांना दुसऱ्या राज्यातून पोलिसांनी शोधून आणलं होतं. आता त्यांच्याविरोधात झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. ''जंगली महाराज रस्त्यावरील ऑफिसमध्ये बोलवून बेदम मारहाण केली. त्यात पाय फ्रॅक्चर झाला आहे, असे तक्रारदाराने म्हटलं आहे.  

पाषाणकर यांच्याकडून फ्लॅट घेण्यासाठी संबधीत तक्रारदाराने त्यांना अडीच कोटींची रक्कम दिली होती. मात्र त्यानंतर देखील पाषाणकर यांनी फ्लॅट संबंधित व्यक्तीच्या नावे करून दिला नाही. त्यामध्ये टाळाटाळ सुरू झाली. तक्रारदाराने यासंदर्भात जाब विचारला असता त्याला थेट कार्यालयात बोलवून मारहाण आणि दमदाटी केली असून त्यात आपला पाय फ्रॅक्चर झाल्याचा आरोप संबंधित व्यक्तीने आपल्या तक्रारीत केला आहे.  

लावणी सम्राज्ञी हातावर बांधणार घड्याळ ; अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे : ‘कारभारी दमानं’ म्हणत रसिकांना साद घालणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर Surekha Punekar राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे १६ तारखेला राष्ट्रवादी कॉग्रेस भवनात होणाऱ्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ''मी आता पर्यंत कलेची सेवा केली आता मला राजकारणात सेवा करायची आहे. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहे. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहे,'' असे सुरेखा पुणेकर यांनी सांगितले. त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com