बैलगाडा शर्यती : अमोल कोल्हेंची मागणी सुनील केदार यांच्याकडून मान्य

बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश पशुसंवर्धन मंत्री केदार यांनी दिला. तसेच, या प्रकरणाची सुनावणी लवकर व्हावी, यासाठी महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासनही दिले आहे, अशी माहिती शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
Bullock cart race: Amol Kolhe's demand accepted by Sunil Kedar
Bullock cart race: Amol Kolhe's demand accepted by Sunil Kedar

मुंबई : बैलगाडा शर्यतवरील बंदी उठविण्याबाबत रणनिती ठरविण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी आज (ता. 13 ऑगस्ट) मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

या बैठकीत बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश पशुसंवर्धन मंत्री केदार यांनी दिला. तसेच, या प्रकरणाची सुनावणी लवकर व्हावी, यासाठी महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासनही दिले आहे, अशी माहिती शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. 

बैलगाडा शर्यती सुरू करण्याच्या बाजूने राज्य सरकारने नव्याने प्रतिज्ञापत्र करावे. या शर्यतबंदीच्या निर्णयामुळे खिल्लार बैलांची जात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भूमिका त्यामध्ये मांडावी. तसेच, ग्रामीण अर्थकारण अडचणीत आले आहे, आपली सांस्कृतिक परंपरा नष्ट होत आहे, या गोष्टी ठामपणे मांडाव्यात. त्याचबरोबर, एकाच देशातल्या वेगवेगळ्या राज्यांबाबत सर्वोच्च न्यायालय घेत असलेली भूमिका अन्यायकारक आहे, हेही ठासून मांडले पाहिजे, अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत मांडली. 

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब आरूटे, नितीन शेवाळे, धनाजी शिंदे, संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, अमोल हरपळे आणि पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. परकाळे, सहआयुक्त डॉ. प्रशांत भड, अवरसचिव डॉ. सं. श्री. पंचपोर, सहसचिव माणिक गुट्टे आदी या बैठकीला उपस्थित होते. 

बैलगाडा शर्यतींवर बंदी घातल्याने गावोगावच्या यात्रा ओस पडून ग्रामीण अर्थचक्र थांबले आहे. या शर्यती पुन्हा सुरू केल्यास त्याला चालना मिळेल, असे मत बैलगाडा मालक व संघटना सातत्याने करीत आहेत.

लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात बैलगाडा शर्यतबंदी हा मुद्दा प्रचंड गाजला होता. कोल्हे यांनी ही निवडणूक जिंकताच त्यांनी संसदेत हा मुद्दा सातत्याने मांडून शर्यतबंदी हटविण्यासाठी आवाज उठविला होता. याबाबत ते करत असलेल्या प्रयत्नांची माहितीही डॉ. कोल्हे यांनी बैठकीत दिली. 

बैलगाडा शर्यतबंदीच्या विषयात गांभीर्याने लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने नवीन प्रतिज्ञापत्र सादर करावे. त्यासाठी खासदार अमोल कोल्हे व बैलगाडा संघटनेने मांडलेले मुद्दे विचारात घ्यावेत असे पशुसंवर्धन मंत्री केदार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी लवकर घ्यावी, यासाठी महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी आपण चर्चा करू, असे सांगितले. तसेच, या संदर्भात नियमित बैठका घेऊन सुनावणीबाबतच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल, असेही केदार यांनी सांगितले. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com