खेडचे भाऊ हरपले : कार्यकर्त्यांसह नागरिकांची भावना

चाकण सोसायटीपासून त्यांच्या समाजिक व राजकीय कारकिर्दीला1990 च्या दशकात सुरूवात झाली. चाकण-नाणेकरवाडी गटातून ते 1994 मध्ये प्रथम जिल्हा परिषद सदस्य झाले.
Brother of Khed taluka lost: Emotions of citizens along with activists
Brother of Khed taluka lost: Emotions of citizens along with activists

चाकण (जि. पुणे) : खेडचे माजी आमदार सुरेश नामदेव गोरे (वय 56) यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात गेली 25 दिवस उपचार सुरू होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे तालुक्‍यातील राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला असून एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या मृत्युमुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आधार हरपला आहे. 

दरम्यान, सुरेश गोरे यांना तालुक्‍यात भाऊ या टोपण नावाने ओळखले जात होते. अगदी वयस्कर माणसापासून छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्व त्यांना आदराने भाऊ म्हणायचे. भाऊ मितभाषी, संयमी, हसून, गोड बोलणारे होते. त्यामुळे खेड तालुक्‍याचे भाऊ गेले, अशी भावना व्यक्त होत आहे. 

तालुक्‍याच्या राजकारणात गेली पंचवीस वर्षे गोरे यांचा दबदबा होता. चाकण सोसायटीपासून त्यांच्या समाजिक व राजकीय कारकिर्दीला 1990 च्या दशकात सुरूवात झाली. चाकण-नाणेकरवाडी गटातून ते 1994 मध्ये प्रथम जिल्हा परिषद सदस्य झाले. या गटातून त्यांनी दोन वेळा जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली.

जिल्हा परिषद सदस्याच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची संधी दिली. त्याकाळात त्यांनी जिल्ह्यात फिरून विकास कामे करण्यावर भर दिला. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले होते. पण, ऐनवेळी पक्षाने त्यांचे तिकीट बदलले. 

त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते यांचा तीस हजारांवर मतांनी पराभव केला. ते खेडमधील शिवसेनेचे प्रथम आमदार झाले. आमदारकीच्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी बरेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. 

सन 2019 च्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरी ते जनतेची कामे करत होते. लॉकडाउनच्या काळातही त्यांनी सेवाभावी कामे केली. पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या कांदा आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांना मागील महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या रूपाने खेड तालुक्‍यातील शिवसेनेला एक चांगला नेता मिळाला होता, त्यांच्या निधनाने पक्षाचे आणि खेड तालुक्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com