अधिकारी असावा तर असा... 

कांदेने गूगल पे अ‍ॅपद्वारे पाटील यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा केले.
 Both arrested by Anti-Corruption Bureau .jpg
Both arrested by Anti-Corruption Bureau .jpg

पुणे : सोलापूर रस्त्यावर बेकायदा वाळू उपसा करून त्याची वाहतुक करणाऱ्या ट्रकवर तहसीलदारांनी कारवाई केली. कारवाई करुन नये म्हणून तहसीलदारास गूगल पेद्वारे 50 हजाराची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (NCB) अटक केली. (Both arrested by Anti-Corruption Bureau)   

या प्रकरणी दत्तात्रय हिरामण पिंगळे (वय ३३, रा. देऊळगावगाडा, दौंड), अमित नवनाथ कांदे (वय २९, रा. कमलविहार, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) यांना अटक केली आहे. याप्रकरणी हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी 'एसीबी'कडे तक्रार दिली. त्यावरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक केली. 

चार दिवसांपूर्वी हडपसर भागातील शेवाळवाडी परिसरात बेकायदा वाळू उपसा करून निघालेल्या ट्रकवर पाटील व त्यांच्या पथकाने कारवाई केली. त्या वेळी संशयित आरोपी दत्तात्रय पिंगळे याने पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. पाटील यांनी त्याला स्पष्ट नकार दिला.
 
त्यानंतर संशयित आरोपी कांदेने गूगल पे अ‍ॅपद्वारे पाटील यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा केले. पाटील यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलिस आयुक्त सीमा आडनाईक या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com