नाथाभाऊ अजूनही आमचे पालकच; चंद्रकांत पाटील 

विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.
 Eknath Khadse,  Chandrakant Patil .jpg
Eknath Khadse, Chandrakant Patil .jpg

पुणे : विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जळगाव दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या घरी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. यावरुन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या या भेटीसंबंधी बोलताना नाथाभाऊ अजूनही आमचे पालकच आहेत असे म्हटले आहे. पाटील पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (BJP state president Chandrakant Patil criticizes the state government)

फडणवीस यांच्या भेटीगाठींमधून भाजपचा संघर्ष संपणार आहे का? असे विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ''भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही. भेटीगाठी वेगवेगळ्या कारणांनी सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजारी आहेत, अनेकजण भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी करत आहे. त्यांची इच्छाशक्ती दांडगी आहे की आजारी असतानाही त्यांचे कामकाज सुरु आहे. त्यामुळेच फडणवीस त्यांची विचारपूस करण्यासाठी गेले होते, असे पाटील म्हणाले. 

यावेळी पाटील म्हणाले, यानंतर एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिल्याचा विषयही असाच आहे. आपण एकमेकांचे शत्रू जरी असलो तरी त्या भागात असलो तर भेटायला जायचे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. एकनाथ खडसे काय आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच आहेत. त्यांच्या घरात तर भाजपच्या खासदार आहेत. प्रामुख्याने रक्षा खडसे यांना भेटायला फडणवीस गेले होते. संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. संवाद नसेल तर अडचण असते. पण इथे फडणवीस आहेत त्यामुळे काळजी नाही, असे पाटील यांनी सांगितले. 

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून शरद पवार यांच्यावर टीका केल्यासंदर्भातही पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पाटील यांनी सांगितले की पवार हे सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. तसे म्हटल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो. माझी चर्चा करायची तयारी आहे. मी निकाल वाचला. त्यात पावला पावलावर जाणवते आहे की, चुका आहेत. ॲार्डिनन्सचा कायदा केला नाही, असा आरोप पाटील यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com