चंद्रकांत पाटील म्हणतात...त्यासाठीच मुख्यमंत्री व्हायचे असते - BJP state president Chandrakant Patil criticizes Chief Minister Uddhav Thackeray  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

चंद्रकांत पाटील म्हणतात...त्यासाठीच मुख्यमंत्री व्हायचे असते

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

महाविकास आघाडीमध्ये सहकार क्षेत्राच्या फंद्यात शिवसेना पडलीच नाही. त्यांनी शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातून सामान्य माणसाचे काम केले.

पुणे : मुख्यमंत्र्यांच्या पेनमध्ये खूप अधिकार असतात ते त्यांच्या पेनने विधानसभा अध्यक्षपद कायम स्वरुपी काढून टाकू शकतात. किंवा विधानसभेला अध्यक्षांची गरज नाही असही करू शकतात. त्यासाठीच मुख्यमंत्री व्हायचे असते. अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न वगळण्यात आले आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakat Patil) यांनी केला.  (BJP state president Chandrakant Patil criticizes Chief Minister Uddhav Thackeray) 

पाटील पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीमध्ये सहकार क्षेत्राच्या फंद्यात शिवसेना पडलीच नाही. त्यांनी शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातून सामान्य माणसाचे काम केले. आता कालचक्र असे आले आहे, की कोणीच वाचणार नाही. मी चुक केली असली किंवा अजितदादांनी वा देवेंद्र फडणवीस यांची चुक असली तरी. लोक आता हुशार झाली आहेत''. असे पाटील म्हणले. 

हे ही वाचा : मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात; भाजपची राज्य सरकारला पहिली सूचना...

राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सहकारी साखर कारखान्यांना कर्ज द्यायचे. कारखाना दिवाळखोरीत काढायचा आणि परत विकत घ्यायचा. यामुळे या सगळ्या सहकारी साखर कारखाण्यांची चौकशी लावण्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार असल्याचे पाटील म्हणाले.  

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिणार आहे. मराठा आरक्षणावरुन मराठा समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सर्व पक्षीय नेत्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी. यात तज्ज्ञांना बोलावा, माध्यमाच्या प्रतिनिधींना बोलवा, मग मराठा आरक्षण हा केंद्राचा की राज्याचा विषय आहे. या विषयी दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अशी बैठक बोलवावी. कोरोनाची भीती असेल तर ऑनलाईन बैठक बोलवा, असे पाटील म्हणाले. 

हे ही वाचा :  विधानसभा अध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या मनातील नाव कोणते?

ओबीसी आरक्षणा विषयी विचारले असता पाटील म्हणाले, इंपेरियल डाटा राज्याने गोळा करायचा असतो. तो गोळा करताना ज्या अनेक आकडेवारींची मदत घ्याची असते. त्यामद्ये जनगणनेची मदत घ्या, मागास्वर्गीय आयोगाला कायम स्टाफ द्या, सहा महिन्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागले, असे पाटील यांनी सांगितले.  

केंद्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात दाखल केलेली पुनर्वीचार याचिका फेटाळली आहे. त्यावर विचारले असता पाटील म्हणाले, फडणवीस सरकारने कायदा व्यवस्थीत केला नसता तर तो उच्च न्यायालयाने मान्य केला नसता. ते काय भाजपचे कार्यकर्ते आहेत का, असा सवाल त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने कायदा रद्द करताना त्यामध्ये झालेले प्रवेश ग्राह्य धरले आहेत, असे पाटील म्हणाले.

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख