पुणे पदवीधरमध्ये भाजपने नोंदवली 25 हजार दुबार नावे : रूपाली पाटील

बोगस मतदान करताना असा कुणी आढळला, तर मनसे स्टाईलने त्याचा समाचार घेण्यात येईल.
BJP registers 25,000 double names in Pune graduate constituency: Rupali Patil
BJP registers 25,000 double names in Pune graduate constituency: Rupali Patil

पुणे : "पुणे पदवीधर मतदारसंघात जवळपास 25 हजार नावे दुबार नोंदविण्यात आली आहेत. शिवाय पदवीधरांची नोंदणी करताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपर्कासाठी क्रमांक ज्याची नोंदणी केलीय, त्यांचा न देता स्वत:चाच फोन क्रमांक दिला आहे. यातून बोगस मतदानाची शक्‍यता असून या प्रकाराची तत्काळ चौकशी करावी,' अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ऍड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केली आहे. 

बोगस मतदान करताना असा कुणी आढळला, तर त्याची गय केली जाणार नाही. मनसे स्टाईलने त्याचा समाचार घेण्यात येईल, असा इशाराही ऍड. पाटील यांनी दिला आहे. या संबंधीचे निवेदन ऍड. पाटील यांनी पुणे विभागाचे निवडणूक अधिकारी सौरभ राव यांना आज (ता. 27 नोव्हेंबर) दिले आहे. 

"सरकारनामा'शी बोलताना त्यांनी मतदार नोंदणीत झालेल्या गोंधळाची सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, ""अत्यंत नियोजनपूर्वक हे काम करण्यात आले आहे. यातून मतदान वाढविण्याचा प्रयत्न भाजपकडून होऊ शकतो. या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची विनंती आज विभागीय आयुक्त व पुणे पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी सौरभ राव यांना भेटून केली आहे. प्रत्यक्ष मतदान येत्या एक डिसेंबरला आहे. मतदानादिवशी आपण बोगस मतदान होणार नाही, यासाठी लक्ष देणार आहोत.'' 

या निवडणुकीत ऍड. पाटील-ठोंबरे यांनी महाआघाडी तसेच भाजपच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे केले आहे. मतदारसंघातील पाच जिल्ह्यांत प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या असून मतदानाचे नियोजन व प्रत्यक्ष मतदानावर आपले लक्ष राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

पदवीधरांचे न्याय प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत पदवीधर आमदारांनी काहीही केलेले नाही. केवळ नशिबाने सारे आमदार झाले आहेत. मुळात पदवीधरांचे खरे प्रश्‍न याआधीच्या आमदारांना कळालेच नाहीत. पुणे विभागातील मतदारांनी विश्‍वास दाखवून निवडून दिल्यास पदवीधरांसाठी भरीव स्वरूपाचे काम करण्यास आणखी हुरूप येईल, अशी भावना ऍड. पाटील-ठोबरे यांनी व्यक्त केली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com