BJP MLAs meet Sharad Pawar for this: Chandrakant Patil
BJP MLAs meet Sharad Pawar for this: Chandrakant Patil

भाजपचे आमदार यासाठी शरद पवारांना भेटतात : चंद्रकांत पाटील  (व्हिडिओ)

भारतीय जनता पक्षाचा कोणताही आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात नाही. महाविकास आघाडी सरकारकडून एवढी खुन्नस काढली जात आहे की आमदारांच्या मतदारसंघातील विकासाची कामेही होत नाहीत. म्हणून काही आमदार शरद पवार यांना भेटतात,असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप आमदारांच्या पक्षांतराच्या बातम्याबाबत दिले.

पुणे : "भारतीय जनता पक्षाचा कोणताही आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात नाही. महाविकास आघाडी सरकारकडून एवढी खुन्नस काढली जात आहे की आमदारांच्या मतदारसंघातील विकासाची कामेही होत नाहीत. म्हणून काही आमदार शरद पवार यांना भेटतात. विकास कामे मार्गी लावण्यासाठी पवारांकडे आग्रह धरावा लागतो. याचा अर्थ भाजपचे आमदार तिकडे चालले, असा होत नाही,' असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप आमदारांच्या पक्षांतराच्या बातम्याबाबत दिले. 

आमदार पाटील यांनी आज (ता. 10 ऑगस्ट) पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. पुणे शहरातील कोरोना साथीच्या परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते. 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना जंबो हॉस्पिटलची आवश्‍यकता काय? असा सवाल पाटील यांनी या वेळी उपस्थित केला आहे. शहरात तीन तीन हॉस्पिटल आणि त्यावर तीनशे कोटी का खर्च करताय? मुंबईतील अनेक हॉस्पिटल सध्या रिकामी आहेत. सध्याची परिस्थिती पाहता पुण्यातील ही जंबो रुग्णालये मला तरी अनावश्‍यक वाटतात, असेही पाटील म्हणाले. 

पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दररोज लोकांना सोप्या शब्दांत कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीची माहिती दिली पाहिजे. आज किती रुग्ण सापडले, त्यातील ऑक्‍सिजन बेडवर किती गेले आणि व्हेंटिलेटरवर किती रुग्णांना लावावा लागला. सर्वात म्हणजे नॉर्मल (बरे होणारे) रुग्ण किती आहेत, याबाबत जनतेला समजावून सांगितले पाहिजे. शहरात ऑक्‍सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेड आत्ता पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, असेही आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. 

भारतीय जनता पक्षाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याबाबतच्या प्रश्‍नावर पाटील म्हणाले की, जुने संबंध सर्वांचेच असतात. आमदारांची मतदारसंघातील काही कामे असतात. ती मार्गी लागावी, यासाठी ते पवारांना भेटत असतात. मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींना अशा भेटीगाठी घ्याव्या लागतात. भाजपच्या 105 आमदारांमधील 80 जणांना तिकडं जावं लागेल, ते एवढं सोपं आहे का?' असा प्रश्‍नही चंद्रकांत पाटील यांनी आमदारांबाबत उठत असलेल्या वावड्यावर उपस्थित केला. 

शरद पवार आणि महाविकास आघाडी आपल्या आमदारांना विश्‍वास देण्यासाठी आपले कोठेही जात नाहीत, त्यांचेच आणतो, असा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असा टोलाही त्यांनी शरद पवारांना लगावला. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com