महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाण   

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
BJP leader Chitra Wagh criticizes NCP .jpg
BJP leader Chitra Wagh criticizes NCP .jpg

पुणे : पुण्यात (Pune) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण झाल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. मारहाणीसंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात ही घटना घडली. (BJP leader Chitra Wagh criticizes NCP)  

घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. वाघ यांनी यावरुन राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. हे धक्कादायक चीड आणणारे आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात चित्रा वाघ यांनी ट्वीट केले आहे. 

वाघ आपल्या ट्वीटमध्ये म्हटल्या आहेत की ''हे धक्कादायक चीड आणणारे आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारे आहे! पुण्याजवळील कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झालीय! मारहाण करणारा कोण? तर तो आहे राष्ट्रवादीचा कर्याकर्ता!'' असे वाघ म्हणाल्या आहेत. 

''गृहखाते ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकारी गलीच्छ शिवीगाळ करणे त्यांना ॲट्रोसिटीच्या धमक्या देणे महिला सरपंचाला मारहाण करणे याचे लायसन्स दिलयं का?? मुख्यमंत्री महोदय जी...'' असा सवाल वाघ यांनी केला आहे.   

याप्रकरणी गायकवाड (वय- ४०, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात सुजित काळभोर यांच्या विरोधात तक्रार दिली. तर तर सुजित काळभोर यांनीही गायकवाड, अविनाश बडदे (दोघेही रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली), सचिन अरविंद काळभोर, महेश ज्ञानेश्वर काळभोर (रा. दोघेही लोणी काळभोर, ता. हवेली) यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. 

गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कदमवाकवस्ती एंजल हायस्कूल, माळवाडी, येथे आरोग्य विभागामार्फत कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी त्या एंजल हायस्कूल या ठिकाणी उपस्थित होत्या. येथे सुजित काळभोर आल्यानंतर अविनाश बडदे यांच्याशी शब्दिक बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत झाले. सुजित काळभोर याने गायकवाड यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. सरपंच या नात्याने ते भांडण सोडवण्यासाठी त्या गेल्या असता लज्जा उत्पन्न होईल, अशा शिव्या देऊन मारहाण केल्याप्रकरणी काळभोर यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली. 

सुजित काळभोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश बडदे यांनी दम भरल्याने शाब्दिक वाद झाला. त्या ठिकाणी गायकवाड आल्या व त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांत हाणामारी सुरु झाली. त्यानंतर तेथे सचिन काळभोर, महेश काळभोर आले व या चौघांनी मिळून हाताने मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमृता काटे या करत आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com