माझ्यासह नेते, प्रशासनामध्ये संवेदना शिल्लक नाहीत..असे शरद बुट्टे पाटील का म्हणाले... - BJP group leader Sharad Butte Patil asked the administration about Kovid patients | Politics Marathi News - Sarkarnama

माझ्यासह नेते, प्रशासनामध्ये संवेदना शिल्लक नाहीत..असे शरद बुट्टे पाटील का म्हणाले...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 मे 2021

माझ्यासह नेत्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये संवेदना शिल्लक राहिल्या नाही, असे दिसते, असे बुट्टे पाटील म्हणाले.   

पुणे : पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. गुरुवारी २ हजार ९०२ रग्ण आढळले आहे. तर दिवसभरात २ हजार ९८६ रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या २४ तासात ६६ रुग्णाला मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत पुणे जिल्हा परिषद Pune Zilla Parishad भाजप bjp गटनेते शरद बुट्टे पाटील Sharad Butte Patil यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.  BJP group leader Sharad Butte Patil asked the administration about Kovid patients

शरद बुट्टे पाटील म्हणाले की, प्रशासनाच्या आकडेवारीमध्ये बरीत तफावत आहे. मृत्यू संख्या प्रचंड मोठी आहे पण आपल्याकडे त्याचे रेकॉर्ड येत नाही. कंटेनमेंट झोन कुठेही केले जात नाही. ही कारवाई शून्य आहे. सर्व मोकळे सोडलेले आहे. ग्रामीण भागात काहीही बंद नाही. काहीही कारवाई होत नाही. संसर्गाचा वेग प्रचंड असून मृत्यूचे प्रमाण आपल्या आकडेवारीपेक्षा कितीतरी पट जास्त आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्याचिका दाखल करणार : एकनाथ शिंदे 
    
कारखाने बंद केले नाही तर एक दिवस तालुक्याचा रोजचा आकडा १००० चे पुढे जाईल. तुम्ही कितीही covid सेंटर काढली तरी रुग्णांना जागा मिळणार नाही. इतके भयानक चित्र पुढे पुढे येत असताना देखील संसर्ग थांबवण्यासाठी धाडसी निर्णय घ्यायला कुणीही तयार नाही हे पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यामध्ये दुर्दैवाचे वाटते. माझ्यासह जिल्ह्यातील नेत्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये संवेदना शिल्लक राहिल्या नाही असे दिसते, असे बुट्टे पाटील यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख