ईडी-सीबीआयचं महत्व भाजपनं संपवलं ; पटोलेंचा आरोप

स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरु असल्याचेही त्यांनी पुन्हा सांगितले.
4nana_4.jpg
4nana_4.jpg

पुणे : ''भाजप सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्या नेत्यांवर ईडी किंवा सीबीआय चैाकशी लावण्याचे काम भाजप सध्या करीत आहे. त्यामुळे देशातील दोन मोठ्या तपास यंत्रणांचे महत्व भाजपनं संपवलं आहे,'' असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. पटोले पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरु असल्याचेही त्यांनी पुन्हा सांगितले. BJP eliminates the importance of ED CBI Nana Patole

नाना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी कृषी कायदा कुठल्याही परिस्थिती राज्यात लागू करणार नाही. या तीनही कायद्याला आमचा विरोध आहे. या जाचक कृषी कायद्यामुळे कृषी व्यवस्था उद्धवस्थ करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.

या कायद्याच्या माध्यमातून देश विकायचे धोरण केंद्र सरकारचे आहे. या तीनही कायद्यामुळे मुठभर लोकांना फायदा होणार आहे. महाराष्ट्रात हा कायदा लागू करणार नाही. त्यासाठी नवीन कायदा राज्य सरकार करणार आहे. शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन हा नवीन कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असेल, असे पटोले म्हणाले. 

काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार का, या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविण्याबाबत ठाम आहे. सध्या त्याबाबत चाचपणी सुरू आहे. योग्य वेळ आली की निर्णय घेऊ.  

चारनंतर दुकान सुरू ठेवण्यासाठी वसुलीचे नवे रेट कार्ड ; मनसेचा टोला
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. देशपांडे यांनी एक व्हिडिओ टि्वट करीत ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com