...एक रुपयाचीही मदत सरकारने केली नाही..चंद्रकांतदादांची टीका

वाघ्या,मुरळी, पोतराज, लोकगीतकार, लोकगायक यांना मदत करण्यात आली.
1Chandrakant_20Patil_20_20Uddhav_20Thackeray_0.jpg
1Chandrakant_20Patil_20_20Uddhav_20Thackeray_0.jpg

पुणे :  "कोरोनाची पहिली लाट ओसरुन दुसरी आली, आता तिसरी लाट ही येण्याची शक्यता आहे. यामध्ये गेल्या दीड वर्षापासून आम्ही राज्य सरकारकडे सातत्याने मागणी करत आहोत की, हातावर पोट असणाऱ्या असंघटित कामगारांपैकी बारा बलुतेदारांना मदत करा. पण गेल्या दीड वर्षात एक रुपयाही मदत राज्य सरकारने Thackeray government केली नाही," अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी केली.  bjp Chandrakant Patil criticism of the Thackeray government

पाटील म्हणाले की, कोरोनाचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या बारा बलुतेदारांना बसला. या वर्गाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून आम्ही सातत्याने राज्य सरकारकडे मागणी करत आहे. पण त्यांना काहीही मदत राज्य सरकारने केली नाही. राज्यात मुख्यमंत्री दुसरा लॉकडाऊन लागू करत होते, तेव्हाही आमची या वर्गासाठी आर्थिक पॅकेज देण्याची मागणी केली होती. पण सरकारने काय दिलं. राजा उदार झाल्या प्रमाणे फक्त १५०० रुपयाची मदत केली. एवढ्या मदतीत एखाद्या कुटुंब तरी कसे चालेल. कोरोनाचे संकट अजून किती काळ चालेल, हे कुणालाच माहीत नाही. मात्र याचा सामना करताना आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला नेहमी तत्पर राहिलं पाहिजे. अशी सूचना ही पाटील यांनी यावेळी केली. 

मुकुल माधव फाउंडेशन व क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या माध्यमातून पाटील यांच्या हस्ते लोक कलावंताना एक महिना पुरेल इतका शिधावाटप करण्यात आले. या कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी वाघ्या,मुरळी, पोतराज, लोकगीतकार, लोकगायक यांना मदत करण्यात आली.  

सुया घे, पोत घे या गाण्यासह गुगलबाई ही सुपरहिट गाण्याचे सर्जक प्रदीप कांबळे, शांताबाई फेम संजय लोंढे, लय मजबूत भीमाचा किल्ला या गाण्याचे गीतकार संगीतकार गायक सचिन येवले, शैलेश येवले, याच बरोबर लय वाढीव दिसतंय राव, खिशात असतील मनी तर मागे लागतील सतरा जणीचे संगीतकार सचिन अवघडे यासह अनेक कलावंत अडचणीत आले आहेत.  

प्रदीप कांबळे यांनी आपली व्यथा मांडली. गेल्या दीड वर्षापासून एक ही कार्यक्रम न झाल्याने एक रुपयाची कमाई झाली नाही. त्यातच कोरोनामुळे आर्थिक खर्चाचा भार देखील पडला‌. राज्य सरकारकडून अद्याप काहीही मदत झाली नाही. त्यामुळे सरकार दरबारी आम्हा लोक कलावंतांची व्यथा मांडून, आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती त्यांनी यावेळी साश्रूनयनांनी केली. 

या कार्यक्रमाचे संयोजन क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केले,  नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी आभार मानले. मुकुल माधव फाऊंडेशनचे जितेंद्र जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. योगेश रोकडे, प्रशांत हरसुले, पुनित जोशी, हर्षदा फरांदे, ऍड.मिताली सावळेकर, रामदास गावडे, जयश्री तलेसरा,अमोल डांगे, अपर्णा लोणारे, माणिकताई दीक्षित, कल्याणी खर्डेकर,  प्रतीक खर्डेकर उपस्थित होते.
Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com