मुख्यमंत्र्याच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह लिखाण करणारा भाजपचा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात

आक्षेपार्ह व बदनामीकार मजकुर टाकणाऱ्या 13 जणांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एकास अटक केली होती.
Sarkarnama Banner - 2021-05-11T154354.312.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-11T154354.312.jpg

पुणे  : मागील आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलही फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह व बदनामीकार मजकुर टाकणाऱ्या 13 जणांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एकास अटक केली होती. BJP activist arrested for writing objectionable articles about CM wife

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या पत्नीबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेली व्यक्ती एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi  व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  Yogi Adityanath यांच्याबद्दलही आक्षेपार्ह मजकुर टाकणाऱ्या दोघांविरुद्धही सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय 52, रा. वडगाव शिंदे, हवेली) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने 7 मे रोजी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले होते. त्यानुसार त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. काकडे याचे स्टेशनरीचे दुकान आहे. त्याने घटनात्मक पदाचा आणि प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणणारे कृत्य जाणून-बुजून केले आहे. त्यामुळे त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोदी, योगी यांची  बदनामी करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मोहसीन शेख आणि शिवाजीराव जावीर अशी गुन्हा दाखल झालेल्यांनी नावे आहेत. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे सोशल मिडीआ सेलचे शहर संयोजक विनीत वाजपेयी यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. शेख आणि जावीर यांनी समाजमाध्यमावर मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता. त्यांच्या छायाचित्रात काही फेरफार करण्यात आला होता, असे वाजपेयी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. शेख एका राजकीय पक्षाच्या युवक आघाडीशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com