Big announcement for members from Baramati Teachers Society
Big announcement for members from Baramati Teachers Society

निवडणुकीच्या तोंडावर बारामती शिक्षक सोसायटीकडून घोषणांचा पाऊस 

बारामती तालुका शिक्षक सोसायटीने कर्जाचा व्याजदर घटवून नऊ टक्के केला असून कर्जमर्यादा दुप्पट म्हणजे वीस लाखांपर्यंत वाढविली आहे. सर्वत्र आर्थिक कोंडी झाल्याचे चित्र असताना सोसायटीने शिक्षकांना बारा टक्के लाभांश आणि वीस लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जदर नीचांकी ठेवून उच्चांकी लाभांश देणारी ही जिल्ह्यातील पहिलीच शिक्षक सोसायटी ठरणार आहे.

सोमेश्वरनगर (जि. पुणे)  : बारामती तालुका शिक्षक सोसायटीने कर्जाचा व्याजदर घटवून नऊ टक्के केला असून कर्जमर्यादा दुप्पट म्हणजे वीस लाखांपर्यंत वाढविली आहे. सर्वत्र आर्थिक कोंडी झाल्याचे चित्र असताना सोसायटीने शिक्षकांना बारा टक्के लाभांश आणि वीस लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जदर नीचांकी ठेवून उच्चांकी लाभांश देणारी ही जिल्ह्यातील पहिलीच शिक्षक सोसायटी ठरणार आहे. येत्या वर्षातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना ही लॉटरी लागली आहे. 

बारामती तालुका शिक्षक सोसायटीची निवडणूक नेहमीच बहुचर्चित असते. सोसायटीची निवडणूक 2021 च्या सुरवातीलाच येऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर सभासद शिक्षकांना संचालक मंडळाकडून मोठ्या निर्णयांची उत्सुकता होती. गेल्या वर्षी सोसायटी संगणकीकृत केली होती. आता नव्या निर्णयांची भर पडली असून त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरायला सत्ताधाऱ्यांना काहीसे बळ मिळणार आहे. 

कर्जासाठी नऊ टक्के व्याजदर 

सध्याच्या संचालक मंडळाने मागील चार वर्षांत कर्जाचा व्याजदर अकरा टक्‍क्‍यांहून हळूहळू घटवत आणला. मार्चअखेर संस्था स्वभांडवली झाल्याने आणि शंभर टक्के वसूल असल्याने संस्थेला मोठे निर्णय घेणे शक्‍य झाले आहे. मागील वर्षी कर्जाचा व्याजदर साडेनऊ टक्के होता. आता 1 जुलैपासून वितरित केल्या जाणाऱ्या नियमित कर्जासाठी नऊ टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. मागील वर्षी साडेदहा टक्के लाभांश होता. यावर्षी तो 12 टक्के दिला जाणार आहे. कर्जाचा कमी व्याजदर असताना जादा लाभांश काढणारी ही राज्यातील पहिली शिक्षक सोसायटी ठरू शकते. आपत्कालीन कर्जाचा व्याजदर तर राष्ट्रीयकृत बॅंकांपेक्षा कमी म्हणजे अवघा आठ टक्के आकारला जाणार आहे. नियमित कर्जाची मर्यादा दहा लाखांवरून अधिकतम वीस लाखांपर्यंत करून शिक्षकांना छप्परफाड मदत करण्याचे ठरविले आहे. 

शासकीय परवानगीनंतर लाभांशवाटप 

पगाराच्या रकमेनुसार कर्जमर्यादा ठरणार असून येत्या पंधरवड्यात त्याचा लाभ देण्यास सुरुवात केली जाणार आहे. तर लाभांशवाटप शासकीय परवानगीनंतर केले जाणार आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष गजानन गाढवे, उपाध्यक्ष राजेंद्र होले व सचिव संतोषकुमार राऊत यांनी दिली. तालुक्‍यातील विविध शिक्षक संघटनांनी याचे स्वागत केले आहे. शिक्षक सभासदांचा पाठिंबा, वाढत चाललेल्या ठेवी आणि पारदर्शक कारभार यामुळे कर्जाच्या व्याजदरापेक्षा तीन टक्के जास्त बोनस देता आला. राज्यात सर्वप्रथम बोनस जाहीर करत आहोत, असे मत गाढवे यांनी व्यक्त केले. 

पेन्शनविरहीत शिक्षकास तीस लाखांचा विमा 

सोसायटीने स्वबळावर विमा योजना राबविली आहे. प्रत्येक शिक्षक सभासदाची दरमहा दोनशे रुपयांची कपात करून वीस लाखांचे विमासंरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. कपातीची रक्कम टप्प्याटप्प्याने कमी केली जाणार आहे. जे शिक्षक जुन्या पेन्शन योजनेत बसत नाहीत (2005 नंतरचे) त्यांना तेवढ्याच कपातीवर तीस लाखांचे विमा संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. कुठल्याही कारणास्तव अथवा नैसर्गिक मृत्यू झाला तरीही विमा दिला जाईल, अशी माहिती गजानन गाढवे यांनी दिली. 

Edited By  : Vijay Dudhale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com