भोरचे आबाराजे पंतसचीव यांचे निधन 

आबाराजे (चितामणराव) सदाशिवराव पंतसचीव (वय ८६) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
aabaraje22.jpg
aabaraje22.jpg

भोर (पुणे) : भोर संस्थांनचे राजे आबाराजे (चितामणराव) सदाशिवराव पंतसचीव (वय ८६) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. भोर संस्थानचे ते १३ वे वंशज होते. त्यांच्यामागे पत्नी उर्मिलादेवी, मुलगे राजेशराजे, दीपकराजे व योगेशराजे हे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

त्यांना क्रिकेट आणि टेनिस खेळाची विशेष आवड होती. १९५६ साली ते पुणे विद्यापीठाच्या क्रिकेट टीमचे कर्णधार होते. वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत ते टेनिसच्या स्पर्धांमध्ये भाग घेत होते. त्यांना फिरण्याचीही विशेष आवड असल्याने त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या होत्या. भोरमधील सर्वात जुन्या समजल्या जाणा-या भोर एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष होते. 

आबाराजेंचे आजोबा राजा रघुनाथराव यांनी भोरमध्ये सुरु केलेल्या रामनवमी महोत्सवाचा वडिलांच्या काळात काही वर्षे पडलेला खंड १९७८ साली त्यांनी पुन्हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सर्व भोरवासीयांना राजवाड्यात महाप्रसाद दिला जायचा. मनमिळावू स्वभावाचे असलेले आबाराजे पंतसचीव यांना भोरवासीयांविषयी मोठा आदर होता.


हेही वाचा : एकाच कुटुंबातील पाच जणांचा नदीत बुडून मृत्यू 
कोळवण (पुणे) : मुळशी तालुक्‍यातील वाळेण या गावात वळकी नदीच्या डोहात कपडे धुण्यासाठी गेलेले पती-पत्नी व तीन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. 21 फेब्रुवारी) घडली. पौड पोलिसांनी याबाबतची दिली. दरम्यान, मृत्यू झालेल्या पाचही जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात ग्रामस्थ व मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला यश आले आहे. शंकर दशरथ लायगुडे (वय 38), पौर्णिमा शंकर लायगुडे (वय 36), अर्पिता शंकर लायगुडे (वय 21), अंकिता शंकर लायगुडे (वय 15) आणि राजश्री शंकर लायगुडे (वय 12, सर्व रा . वाळेण, ता. मुळशी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जयश्री शंकर लायगुडे (वय 10) या मुलीचे मात्र प्राण वाचले आहेत. पौर्णिमा आणि शंकर लायगुडे हे पती-पत्नी आपल्या परिवारासह रविवारी (ता. 21 फेब्रुवारी) सकाळी दहाच्या सुमारास कपडे धुण्यासाठी वळकी नदीच्या डोहात गेले होते. त्यावेळी त्यांची लहान मुलगी जयश्रीचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी तिची आई पौर्णिमा ह्या डोहाच्या पाण्यात उतरल्या. परंतु त्या दोघीही बुडायला लागल्यावर अंकिता व राजश्री यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी ठरला. त्या दोघीही बुडल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com