भरणे-जाचकांचे अखेर 'मिले सूर मेरा तुम्हारा'; छत्रपती कारखान्यात मोळी टाकण्याचा एकच कार्यक्रम 

कारखाना निवडणुकीच्या तोंडावर हे मतभेद पक्षाला परवडणारे नव्हते.
Bharane-Jachak's end "Mile Sur Mera Tumhara"; The only event to launch sugarcane crushing at Chhatrapati factory
Bharane-Jachak's end "Mile Sur Mera Tumhara"; The only event to launch sugarcane crushing at Chhatrapati factory

वालचंदनगर (जि. पुणे) : "जाचकांचे भरणेंशी सूर जुळेनात; छत्रपती कारखान्यात दोनदा होणार मोळी टाकण्याचा कार्यक्रम' असे वृत्त 'सरकारनामा'ने प्रसिद्ध केले आणि इंदापूर तालुक्‍यात एकच चर्चा सुरू झाली.

पक्षातील मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचे पाहून दोघांनी आपापल्या ठरलेल्या वेळेऐवजी 10 वाजून 20 मिनिटांनी कारखान्यावर एका पाठोपाठ दाखल झाले आणि दोघांनी एकत्र येऊन 10.30 मिनिटांनी कारखान्याच्या गव्हाणीत उसाची मोळी टाकत गाळप हंगामास सुरुवात केली. 

साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सक्रीय झाले आहेत. मात्र, इंदापूर तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचे सूर जुळतात की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याला निमित्त होते, छत्रपती कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमाचे. 

इंदापूर तालुक्‍यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 65 व्या उस गाळप हंगाम शुभारंभाचा कार्यक्रम पदाधिकाऱ्यांनी आज (ता 25 ऑक्‍टोबर) सकाळी 11 वाजून 05 मिनिटांनी ठेवला होता. मात्र, या वेळेत अचानक बदल करत रविवारी सकाळी 9 वाजता राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते मोळी टाकण्याचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला.

मात्र, जाचक यांनी त्यास विरोध करत ठरलेल्या वेळेनुसार सकाळी 11 वाजून 05 मिनिटांनी मोळी टाकण्याचा कार्यक्रम करण्यावर ठाम होते. त्यामुळे तालुक्‍यातील या दोन्ही नेत्यांमधील विसंवाद उघड झाला होता. 

याबाबतचे वृत्त "सरकारनामा'ने प्रसिद्ध केले होते, त्यामुळे तालुक्‍यात एकच चर्चा सुरू झाली. एकाच कारखान्यात दोनवेळा मोळी टाकण्याचा कार्यक्रम होणार का? याबाबत दबक्‍या आवाजात कुजबूज चालली होती. त्यातून वेगळा संदेश तालुक्‍यात जाण्याची चिन्हे होती.

कारखाना निवडणुकीच्या तोंडावर हे मतभेद पक्षाला परवडणारे नव्हते. त्यामुळे या दोघांनीही ठरवलेल्या वेळेत बदल केला आणि दोन कार्यक्रमांऐवजी एकाच वेळी मोळी टाकण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान, एका रात्रीत या दोघांमधील मतभेद कसे मिटले, अशी काय जादू झाली, अशी चर्चाही कारखाना कार्यक्षेत्रात होती. 

आज सकाळी 9 वाजता सुरू होणारा कार्यक्रम वेळेत सुरू झाला नाही. वेळ हळूहळू पुढे सरकू लागली, तशी काखान्यावर उपस्थित शेतकऱ्यांमध्ये एकच चूळबूळ सुरू झाली. अखेर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे प्रथम 10 वाजून 20 मिनिटांनी कारखानास्थळी दाखल झाले, त्यांच्या पाठोपाठ राज्यमंत्री भरणे हेही आले. त्यानंतर भरणे, जाचक, कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील व संचालकांनी दहा वाजून 30 मिनिटांनी गव्हाणीत उसाची मोळी टाकली. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com