बगाड यात्रा बावधनकरांना भोवली...६१ गावकरी, दोन पोलिस, नऊ कर्मचारी पॅाझिटिव्ह  - bawadhans bagad yatra 61 people tested positive for corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

बगाड यात्रा बावधनकरांना भोवली...६१ गावकरी, दोन पोलिस, नऊ कर्मचारी पॅाझिटिव्ह 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021


 
बावधन आणि परिसरातील वाड्यावस्त्यांवर कोरोनाचं संकट आहे.

बावधन  : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकार लॅाकडाउन लावण्याच्या तयारीत आहे. सरकारकडून लावण्यात आलेल्या कठोर नियमांचे अनेक ठिकाणी उल्लंघन होत आहे. बावधन येथे नुकत्याच झालेल्या बगाड यात्रेत सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. ही यात्रा गावकऱ्यांनी चांगलीच भोवली आहे. आत्तापर्यंत काही ६१ गावकरी आणि दोन पोलिस आणि ग्रामीण रूग्णालयातील नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  
 

बावधन आणि परिसरातील वाड्यावस्त्यांवर कोरोनाचं संकट आहे. या ठिकाणी ग्रामस्थाची तपासणी करणे गरजेचे आहे. कोरोना बाधितांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. 

 

हेही वाचा : पवारांना रेमडेसिविर इंजेक्शन कुठून मिळाले ?..निलेश राणेंचा सवाल
कर्जत : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यशासन हादरले आहे. जिल्ह्यात आणि तालुक्यातही रुग्णांची वाढती संख्या विचार करायला लावणारी आहे. ही वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आमदार.रोहित पवार पुन्हा एकदा सरसावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून आता पुणे, नगर, बीड, सोलापूर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तुटवडा असलेल्या 300 रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता करण्यात आली आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनी रोहित पवार यांना  रेमडेसिविर इंजेक्शनवरून टीका केली आहे. याबाबत राणे यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. आपल्या टि्वटमध्ये निलेश राणे म्हणतात की, सामान्य जनतेला रेमडेसिविर इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाही मात्र रोहीत पवारांना वाटप करण्या इतपत रेमडीसीवर इंजेक्शन कुठून मिळाले? रेमडीसीवर तुम्हाला कुठून व कोणत्या ठिकाणाहून उपलब्ध झाले याचा रोहीत पवारांनी खुलासा करावा नाही तर तात्काळ सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख