पतीच्या ओैषधासाठी अनवाणी धावून स्पर्धा जिंकणाऱ्या लता करे कारोनाची झुंज हरल्या..पतीचे निधन  - baramati athlete lata kare husband bhagwan kare died due to Corona | Politics Marathi News - Sarkarnama

पतीच्या ओैषधासाठी अनवाणी धावून स्पर्धा जिंकणाऱ्या लता करे कारोनाची झुंज हरल्या..पतीचे निधन 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 मे 2021

बारामतीच्या लता करे यांच्या पतीचे कोरोनाने निधन झाले आहे.

बारामती (पुणे) : मूळच्या बुलढाण्यातील पण बारामतीकर झालेल्या पतीच्या आजारावरील ओैषधासाठी अनवाणी धावून मॅरेथॅान जिंकणाऱ्या लता भगवान करे lata kare या कोरोनाची झुंज हरल्या.  त्यांच्या पतीचे भगवान करे bhagwan kare यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. baramati athlete lata kare husband bhagwan kare died due to Corona

पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावणाऱ्या बारामतीच्या लता करे यांच्या पतीचे कोरोनाने निधन झाले आहे.  लता करे 2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. पतीच्या उपचारासाठी चक्क वयाच्या ६४ व्या वर्षी धावणाऱ्या लता करे यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. 

Maratha reservation : राजकीय जोडे बाजूला ठेवून लढाई जिंकली पाहिजे...

स्पर्धेच्या एक दिवस आधी आजारी असलेल्या लताबाईंना दिसत होती ती बक्षिसाची ५००० रुपयांची रक्कम. या रकमेतून पतीच्या हृदय विकाराच्या तपासण्या करता येणं त्यांना शक्य होतं. अन् त्यांनी हे बक्षिस पटकावलं. सलग तीन वर्ष त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅट्रीक साधली होती. आता त्या ७२ वर्षांच्या आहेत. लता करे यांच्या संघर्षातून प्रेरित होऊन ‘लता भगवान करे, एक संघर्षकथा’असा एक चित्रपट देखील काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे करे यांनीच त्यांची मुख्य भूमिका चित्रपटात साकारली होती. दक्षिणात्य निर्माते ए कृष्णा अरुबोधु यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. 

त्यांच्या जीवनावर आधारीत मराठी चित्रपटास ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष पुरस्कार मध्ये जाहीर झाला आहे. दक्षिणात्य निर्माते ए कृष्णा अरुबोधु यांनी त्यांच्यावर  चित्रपटाची निर्मिती केली, नविन देशबोईना यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यातही विशेष म्हणजे लता करे यांची भूमिका स्वताः लता करे यांनीच साकारलेल्या या मराठी चित्रपटास राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष पुरस्कार मिळाला.

बारामतीमध्ये दरवर्षी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमत्त शरद मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. या स्पर्धेतील एक स्पर्धक म्हणजेच लता भगवान करे नववारी साडी आणि डोक्यावर पदर आणि कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावणाऱ्या ६५ वर्षांच्या लताबाई करे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत लता करे यांनी सहभाग घेतला तो आपल्या कुटुंबासाठी. २०१३ मध्ये पती भगवान करे यांच्या उपचारासाठी त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावल्या आणि प्रथम क्रमांक  देखील पटकवला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख