ठाकरे सरकारला नरकासुराची उपमा देणाऱ्या बंडातात्यांचा आळंदीत निषेध 

राजकारण आणि वारकरी संप्रदायाची गल्लत कराडकर महाराजांनी करू नये.
Bandatatya Karadkar's protest in Alandi from Mahavikas Aghadi :
Bandatatya Karadkar's protest in Alandi from Mahavikas Aghadi :

आळंदी (जि. पुणे) : मंदिर बंदबाबत मुख्यमंत्री आणि सरकारला उद्देशून रावण आणि नरकासुराची उपमा देणारे ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याचा आळंदीत महाविकास आघाडीच्या वतीने दंडावर काळ्या फित लावून पत्रकार परिषद घेत निषेध केला. 

संतांच्या शिकवणुकीवर चालणाऱ्या वारकऱ्यांचा बहुजन समाज आदर करतो. मात्र, तथाकथित वारकऱ्यांनी समाजात मंदीर उघडण्यावरून द्वेषभावना न पसरवता आळंदीत हटवलेले बहुचर्चित दर्शनबारीचे आरक्षण आणि त्याचे बांधकाम कसे होईल, या कडे लक्ष द्यावे. लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत लाखोंच्या संख्येने होणाऱ्या यात्रा कुणाच्याही दबावाला बळी न पडता सरकारने परवानगी देऊ नये, अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. 

आळंदीतील कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, शिवसेनेचे शहरप्रमुख अविनाश तापकीर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, डी. डी. भोसले, उत्तम गोगावले, रोहिदास तापकीर, संदीप नाईकरे, रुपाली पानसरे, शशिकांत राजे, आनंद मुंगसे, आशिष गोगावले, मंगेश तिताडे, अनिकेत डफळ उपस्थितीत होते. 

तीनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविडबाबत लढा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मध्यबिंदू साधत आहेत. एकाधिकारशाहीने वागत नाहीत. मंदिर उघडले जाईल आणि आमचीही तीच मागणी आहे. लस जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत मोठ्या लोकसंख्येच्या देशाला अधिक धोका आहे. आळंदीत कार्तिकिसाठी लाखोंच्या संख्येने आठवडाभर वारकरी मुक्कामी थांबणार पुन्हा गावाकडे जाणार. त्यातून कोविडचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. 

आषाढी वारीपर्यंत आळंदीत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र, पंढरपूरला आषाढी एकादशीसाठी माउलींच्या पादुका नेताना कोरोनाने आळंदीकरांना गाठले आणि तेव्हापासून अजूनही रुग्ण सापडत आहेत. अशावेळी मंदिर उघडण्यासाठी बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केलेली उपमा संप्रदायाला अनुसरुन नाही. त्याचा निषेध होत आहे. कराडकर महाराजांनी बहुजन समाजाचे प्रबोधन करुन सध्याच्या वस्तुस्थितिबाबत जागृत करावे. राजकारण आणि वारकरी संप्रदायाची गल्लत कराडकर महाराजांनी करू नये. 

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात आषाढी कार्तिकी वारीतील वारकऱ्यांसाठीची दर्शन बारीचे आरक्षण का वगळले, याचा जाब संप्रदायाने विचारायला हवा. याचा पाठपुरावा करायचा सोडून कराडकर महाराजांसारखे लोक सर्वसामान्य वारकऱ्यांना मंदिरात पाठवून संसर्गाचा धोका का पत्करायला लावतात.

वारकऱ्यांना प्रदिक्षणा सुलभ व्हावी, यासाठी पालिकेने केलेल्या फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने प्रदिक्षणा करता येत नाही. मंदिरात इंद्रायणीमार्गे जाण्यासाठीचा स्काय वॉक बांधकाम प्रलंबित असताना तथाकथित वारकरी आवाज का उठवत नाहीत? असा सवाल महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com