पूजा चव्हाण प्रकरण आँडीओ क्लिप मधील राठोड पळाला.... - In the audio clip of Pooja Chavan case, Arun Rathod ran away | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

पूजा चव्हाण प्रकरण आँडीओ क्लिप मधील राठोड पळाला....

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

आँडिओ क्लिपमधील संभाषणात सहभागी असलेला एक जण त्यांच्या कुंटुबासह पळून गेला आहे.  

पुणे : पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरूणीचा गेल्या रविवारी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यू की आत्महत्या याबाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. काल तिचा भाऊ आणि त्या भावाच्या मित्राचा जवाब नोंदविण्यात आला आहे. आज पुन्हा या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या प्रकऱणात एक आँडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या आँडिओ क्लिपमधील संभाषणात सहभागी असलेला एक जण त्यांच्या कुंटुबासह पळून गेला आहे.  

एका मंत्र्याशी या मृत्यूचा संबंध जोडला जात असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी या संबंधातील आँडिओ क्लिप पोलिस महासंचालकांकडेही दिल्या आहेत. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव आहे की काय, असा संशय विरोधी पक्षनेते व्यक्त करत आहेत.

पूजाच्या आत्महत्येचे गूढ दिवसागणिक वाढत चालले आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनेक तर्क मांडण्यात येत आहे. मंत्र्यासोबतच्या संबंधातून आलेल्या तणावाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.  मात्र पोलिसांनी त्यास दुजारा दिलेला नाही. या आँडिओ क्लिपमध्ये संभाषण करणारा अरूण राठोड असल्याची चर्चा आहे. तो आज परळी येथून आज आपल्या कुंटुबासह पळून गेला आहे. 

'पहिल्या मजल्यावरून पडलेली पूजा चव्हाण हिने मद्यपाशन केले होते, या दोघांनी दिला आहे,' अशी माहिती वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड यांनी दिली आहे. त्यामुळे पूजाच्या मृत्यूबाबत पुन्हा निराळ्या शंका सुरू झाल्या असून तिनं दारू पिली होती की तिला दारू पाजण्यात आली होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पूजाचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालात डोक्याला आणि मणक्याला दुखापत झाल्याने पूजाचा मृत्यू झाला असल्याचे म्हटलं आहे. 
 
गॅलरीतून उडी मारल्यानंतर पूजाला दवाखान्यात नेले. त्या ठिकाणी डाँक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या संपूर्ण काळात व अगदी शवविच्छेदन करण्यापर्यंतच्या वेळेपर्यंत फोनवरील "ती" व्यक्ती पूजाचा मोबाईल ताब्यात घेण्यास बजावत होती. पूजाच्या खोलीचा दरवाजा तोडा, ते शक्य नसल्यास दोरीने गँलरीत जाऊन मोबाईल ताब्यात घ्या, असाही मार्ग त्या व्यक्तीने सुचवला होता, असेही संभाषणातून दिसते आहे. दरम्यान, पूजाने आत्महत्या केल्यानंतर तिचा मोबाईल तिच्या कुटुंबाने आपल्या ताब्यात घेतला आहे. 

तपासामध्ये मोबाईलची गरज वाटल्यास पोलिसांकडून तो मोबाईल ताब्यात घेतला जाऊ शकेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शिवसेनेच्या विदर्भातील एका मंत्र्याची ती प्रेयसी होती, अशी चर्चा आहे. या प्रकरणातील ऑडिओ क्लिपमध्ये मंत्री आणि अरुण राठोड नामक व्यक्तीचे संभाषण असल्याचे सांगितले जात आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख