पोलिसांच्या गाडीला धडक देऊन आरोपीस पळवून नेण्याचा प्रयत्न

त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Attempt to free the accused by hitting a police vehicle in Indapur
Attempt to free the accused by hitting a police vehicle in Indapur

इंदापूर (जि. पुणे) : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील टेंभुर्णी (ता. माढा) (Tembhurni) हद्दीतील दरोड्याप्रकरणी फरारी असलेला आरोपी अमोल सावंत (Amol Sawant) यास राहत्या घरी म्हणजे सुगाव (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे टेंभुर्णी पोलिसांनी पकडले. सावंत यास टेंभुर्णी येथे नेत असताना इंदापूर (Indapur) तालुक्यातील माळवाडी नंबर एक हद्दीत पोलिसांच्या गाडीला पाठीमागून धडक देऊन आरोपीस पळवून नेण्याचा सिनेस्टाईल प्रयत्न अयशस्वी ठरला. आरोपीस टेंभुर्णी पोलिसांनी माढा न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (Attempt to free the accused by hitting a police vehicle in Indapur)

या प्रकरणी सहा संशयित आरोपी विरुद्ध इंदापूर व टेंभुर्णी पोलिस ठाण्यात भारतीय साथरोग व आपत्ती व्यवस्थापन कायदा, सरकारी कामात अडथळा आणणे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेंभुर्णी हद्दीतील एका दरोड्यातील आरोपी अमोल सावंत हा फरारी होता. तो राहत्या घरी सुगाव येथे असल्याचे समजताच टेंभुर्णी पोलिसांनी ता. १० मे रोजी त्यास घरी जाऊन पकडले. त्याला घेऊन टेंभुर्णीला जात असताना वाटेत माळवाडी नं. १ गावच्या हद्दीत 10 मे रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अमोल सावंत यास घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनास सावंत याच्या नातेवाईकांच्या चारचाकी वाहनाने (एम 42, एएच-2515, एक्स यु व्ही-500) पाठीमागून पाच ते सहा वेळा व उजव्या बाजूस दोन वेळा जोरदारपणे धडक दिली.

या अपघतात टेंभुर्णीचे सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांच्यासह तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. गाडीचे 2 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे योगेश चितळे यांच्या फिर्यादीवरून दत्तू सावंत, रोहन सावंत, अमोल सावंत, उर्मिला सावंत व दोन अल्पवयीन व्यक्ती (सर्व रा. सुगाव, ता.इंदापूर, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र कदम व इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. इंदापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी. एन. लातुरे व एन. एम. ठोंबरे तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com