आपल्याचा गाडीवर दगड मारून घेतला असेल काय सांगावे? : अजितदादांनी उडविली पडळकरांची खिल्ली

अशा प्रकारचा ठराव पक्षाच्या बैठकीमध्ये होणे हे योग्य नाही. चौकशी ही पारदर्शक झाली पाहिजे
 Ajit Pawar, Gopichand Padalkar .jpg
Ajit Pawar, Gopichand Padalkar .jpg

पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यावरून त्यांच्या भाषेबद्दल नाराजी व्यक्त झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने पडळकर यांच्या गाडीवर हल्ला केला होता. त्यावर अजित पवार यांनी आज भाष्य केले. (On the attack on BJP MLA Gopichand Padalkar's car, Ajit Pawar said) 

पवार पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांना पडळकरांच्या गाडीवर झालेल्या हल्याविषयी प्रश्न विचारला. त्यावर पवार म्हणाले की ''पडळकर आरोप करणारच ते विरोधक आहेत. कोणाचे नाव घेणार भापजचे तर घेऊ शरत नाही. मुंबईत गाडीमध्ये एका पोलिसानेच स्फोटके ठेवली होती. त्यामुळे आता अशा पद्धतीने स्वतः रचून आपल्या गाडीवर एखादा दगड मारून घेतला असेल तर काय सांगता येते, असा टोला पवार यांनी लगावला.  

मागे सोलापूरच्या घाटतही एका राजकीय नेत्याच्या गाडीवर दगड का काय पडला होता, त्यावरुन मोठे राजकारण झाले. अनेक जण त्यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. मी गुरुवारी नाशिकमध्ये सांगितले, व्यक्ती कोणिही असु द्या. कायदा कोणिही हातात घेण्याचा प्रयत्न करुन नये. विचारांची लढाई विचारांनीच झाली पाहिजे, असेही पवार म्हणाले.         

दरम्यान, अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी, असा ठरावा भाजपच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता. त्यावर अजित पवार यांनी शुक्रवारी भाष्य केले. पवार म्हणाले, एखाद्या पक्षाच्या बैठकीत अशा प्रकारचा ठराव होण्याची ही देशातील पहिलीच घटना असेल. अशा प्रकारचा ठराव पक्षाच्या बैठकीमध्ये होणे हे योग्य नाही. चौकशी ही पारदर्शक झाली पाहिजे, असे पवार म्हणाले. 

साखर कारखान्याची विक्री ही उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली आहे. जर चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप झाले तर बँक अडचणीमध्ये येते. राज्य सरकारी बँक नफ्यात आहे. माझ्यावरचे आरोप राजकीय दृष्टकोणातून केले गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या साखर कारखान्याची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली होती. त्या विषयी बोलताना अजित पवार म्हणाले, की घोटाळा काय झाला हे भाजपने दाखवावे.  

राज्यातील सर्व साखर कारखान्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार असल्याचे भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर पत्र लिहिले म्हणजे आरोप सिद्ध झाले असे होत नाही. पत्र लिहिणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, देशामध्ये लोकशाही आहे. प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे, असा टोला त्यांनी पाटील यांना लगावला.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com