अरूण लाड हे तर कारखानदार; पदवीधरांशी त्यांचा काय संबंध ? रूपाली पाटील यांचा टोला   - Arun Lad is a manufacturer What do they have to do with graduates Criticism of Rupali Patil-Thombre | Politics Marathi News - Sarkarnama

अरूण लाड हे तर कारखानदार; पदवीधरांशी त्यांचा काय संबंध ? रूपाली पाटील यांचा टोला  

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

अरूण लाड हे कारखानदार आहेत. पदवीधरांशी त्यांचा संबंध काय ? पदवीधरांच्या कोणत्या प्रश्‍नावर त्यांनी आवाज उठविला आहे, असा प्रश्‍न  अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनी  केला आहे.

पुणे : महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड हे आजोबांच्या वयाचे पदवीधर आहेत. ते कारखानदार आहेत. पदवीधरांशी त्यांचा संबंध काय ? पदवीधरांच्या कोणत्या प्रश्‍नावर त्यांनी आवाज उठविला आहे, असा प्रश्‍न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनी आज केला आहे.

स्वातंत्र्यानंतर पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळविणारी मी एकमेव महिला उमेदवार आहे. सुशिक्षित पदवीधर महिला म्हणून मी सातत्याने काम केले आहे. आधी काम केले मग उमेदवारी मागितली. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला उमेदवारी दिली. या निवडणुकीच्या माध्यमातून पदवीधरांच्या प्रश्‍नावर काम करण्यासाठी मला महाराष्ट्र विधीमंडळात संधी मिळेल, असा विश्‍वास अॅड. पाटील-ठोंबरे यांनी व्यक्त केला. 

त्या म्हणाल्या, "अरूण लाड यांनी गेल्यावेळी बंडखोरी केली होती. त्यानंतर ते गेली सहा वर्षे गायब होते. या काळात त्यांनी पदवीधरांसाठी काय काम केले हे मायक्रोस्कोपखाली पाहावे लागेल. निवडणुका आल्यानंतर आता त्याच पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे.''

संबंधित लेख